कायनात अरोरा ची 'खली बली'

ग्रैंड मस्ती मध्ये विवेक ओबेरॉय सोबत झळकणारी अभिनेत्री कायनात अरोरा सहारनपुर सारख्या लहानश्या शहरातून  बॉलीवुड मध्ये आली एक स्वाभिमानी आणि बिंदास मुलगी आहे, जिने अक्षय कुमार अभिनीत चित्रपट 'खट्टा मिठा' मध्ये आइटम सॉन्ग 'आयला रे आयला'  द्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले, त्यानंतर दिग्दर्शक इंद्र कुमारचा 'ग्रैंड मस्ती' मध्ये काम केले, ज्याने धडाकेबाज यश प्राप्त केले. तरी देखील तिच्या टैलेंटकडे मोठ्या मेकर्सनी कानाडोळा केला, तेव्हा ती दक्षिण भारतीय सिनेमातून काम करु लागली. आता पुन्हा एक वेळ कायनात हिंदी चित्रपट 'खली बली' मधून खलबली करण्यासाठी मुख्य अभिनेत्रीच्या रूपात आली आहे. मनोज शर्मा यांचा चित्रपट 'खली बली' हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. ह्या चित्रपटांत कायनात ने संजनाची भूमिका साकारली आहे. चित्रपटांची कथानक तिच्या अवती-भवती फिरत आहे. तिचा रोल तसा गंभीर आहे, परंतु चित्रपटांत भितिदायक कॉमेडीचा जोरदार तडका देखील आहे. चित्रपटांत दूस-या घाबरविणा-या कथेपेक्षा वेगळी अशी सिचुएशनल हॉरर कथा आहे.

निर्माता कमल किशोर मिश्रा यांच्या सिनेमात कायनात सोबत रजनीश दुग्गल, मधु, राजपाल यादव, विजय राज, असरानी, हेमंत पांडे, एकता जैन, रोहन मेहरा आणि यासमीन खान सारखे प्रतिभासंपन्न कलाकार अभिनय करत आहे. चित्रपटांची कथा संजनाच्या जीवनात निर्माण झालेल्या खलबली वर आधारित आहे. चित्रपटांची निर्मिती वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस आणि प्राची मूवीज करत आहे.

तसे पाहिले तर कायनात अरोरा ने मलयालम चे सुपरस्टार मोहनलाल सोबत 'लैला ओ लैला' आणि तमिल सुपरस्टार अजित सोबत चित्रपट 'मंकता' मध्ये काम केले आहे. त्याचबरोबर कायनात ने मोठ्या बजटचा पंजाबी चित्रपट 'फरार' मध्ये सुपरस्टार गिप्पी ग्रेवाल सोबत काम केले आहे. अजून एक पंजाबी चित्रपट 'किटी पार्टी ' मध्ये देखील काम आहे.

कायनात म्हणते कि कलाकारांनी दर्शकांचा सन्मान केला पाहिजे. आपण त्यांची नौकरी करत आहे, कारण ज्या दिवशी दर्शक चित्रपट पाहणे बंद करतील, आपल्या सारखे कलाकार बेरोजगार होतील. प्रोड्यूसर आणि डायरेक्टर आपल्याला फक्त काम देतात, परंतु दर्शक आपले काम पाहून शिखरापर्यंत पोहचवितात. कायनातला लहानपणा पासूनच स्टार बनण्याची इच्छा होती. ती रोमांटिक स्वभावाची मुलगी आहे, तिला रोमांटिक चित्रपट करण्याची इच्छा आहे, परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांच्या स्क्रिप्टमूळेच ती दूस-या प्रकारचे रोल साकार करत चालली आहे. म्हणूनच ती म्हणते कि आपण कामाची निवड करत नाही, तर कामच आपली निवड करते.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर