मधु, कायनात अरोरा, रजनीश दुग्गल, राजपाल यादव, एकता जैन, यासमीन ख़ान यांनी हॉरर कॉमेडी चित्रपट खली बली ची शूटिंग केली.
वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शन व प्राची मूवीज चे कमल किशोर मिश्रा यांनी लेखक दिग्दर्शक मनोज शर्मा सोबत आपला कॉमेडी हॉरर चित्रपट खली बली ची शूटिंग मुंबई येथील ओसियन विला मध्ये केली, तेथे चित्रपटांतील सर्व कलाकार उपस्थित होते. ह्या सिनेमातून मधु आठ वर्षानंतर पर्दापण करत आहे. त्यांनी सांगितले कि आज माझा इंट्रोडक्शन सीन शूट झाला आहे. चित्रपटांत मधु सोबत रजनीश दुग्गल आणि कायनात अरोरा लीड रोल करत आहे. अन्य कलाकार आहेत राजपाल यादव, विजय राज, बृजेन्द्र काला, हेमंत पाण्डे, एकता जैन, रोहन मेहरा, असरानी आणि यासमीन खान. सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेबद्दल मीडियाला सांगितले. चित्रपटांची शूटिंग मुंबई व लखनऊ येथे होणार आहे.
Comments