इश्क़ सुभान अल्लाह मध्ये येणा-या एपिसोड मध्ये फारच ड्रामा होत आहे
सीरियल इश्क़ सुभान अल्लाह मध्ये येणा-या एपिसोड मध्ये फारच ड्रामा होत आहे. कबीर अलीना आणि ज़ाराला मज़हर कडे घेऊन जात आहे. क़बीर आपली गाडी दरग़ाह जवळ पार्क करतो आणि तेथेच थांबतो, महिला दरग़ाह मध्ये जातात. मक़बूल ज्यांने ज़ाराला मागे एकवेळ मारण्याचा प्रयत्न केला होता, तोच परत एकवेळ हल्ला करतो. कबीर मकबूलला पाहतो आणि जाराला वाचवितो. पळत पळत कबीर मकबूलला पकडतो आणि मारतो व त्याची चौकसी करतो परंतु मकबूल काहीच बोलत नाही. त्यानंतर कबीर त्याला पोलिसांकडे देतो. झी टीवी वर सीरियल ‘इश्क सुभान अल्लाह’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता प्रक्षेपित होत आहे. क्रिएटिव्ह आय लिमिटेड द्वारा निर्मित ह्या सीरियल चे निर्माता आहेत धीरज कुमार, ज़ूबी कोचर आणि सुनील गुप्ता.
Comments