मिथुन चक्रवर्ती, लेखक-दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा चित्रपट ‘भूतियापा’ मध्ये काम करणार
मिथुन चक्रवर्ती, लेखक-दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा चित्रपट ‘भूतियापा’ मध्ये काम करणार, ज्याची निर्मिती करत आहेत वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस चे कमल किशोर मिश्रा आणि प्राची मूवीज. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. बातमीनुसार मिथुन दादा एकदम फिट आहेत. त्यांच्या आजारांसंबंधीच्या जितक्या बातम्या येत होत्या, त्या फक्त अफवा पसरविल्या होत्या. तसे पाहिले तर ह्या चित्रपटांचे अधिकांश चित्रिकरण लखनऊ मध्ये होणार आणि उर्वरित मुंबई मध्ये. स्वःत मिथुन ने ह्याबद्दल सांगितले कि ते ह्या चित्रपटांत काम करणार आहे. मिथुन म्हणाले, मी स्क्रिप्ट ऐकली आणि मला फारच पसंत आली. मी भूतियापा मध्ये काम करत आहे. जेव्हा दिग्दर्शक मनोज शर्मा माझ्याकडे कथा ऐकविण्यासाठी आले, त्याचवेळी सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला. मनोज शर्मा ने सांगितले कि मिथुन जी ने होकर दिल्यामुळे मी फारच आनंदीत झालो, कारण त्यांनी माझ्या कथेला पसंत केले आणि माझ्या सोबत काम करण्यासाठी होकर दिला. ह्या चित्रपटांत मिथुन दादा सोबत कृष्णा अभिषेक, सुगंधा मिश्रा आणि राजीव ठाकुर देखील आहे.
Comments