सर्व विचारतात कि गाण्याची हुक लाइन काय आहे : गीतकार कुमार


गीतकार कुमार सांगतात कि  मला इंग्रजी येत नव्हती, इंग्रजी भाषा पासून सुटकारा मी माझ्या गाण्यांनी दूर केला. मी माझ्या गाण्यामधून रिक्वेस्टा पाइंया, परमिशन पाइयां, हैंगओवर, देसी बॉय में लेडी गागा सारख्या शब्दांचा उपयोग केला, जो लोकांनी फारच पसंत केला.

गोलमाल', 'सिंबा', 'जीरो', 'बधाई हो' 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'केसरी', स्टूडेंट ऑफ़ द इयर नुकताच झालेल्या रिलीज़ हिट चित्रपटांना आपल्या गाण्यांनी सजविणारे गीतकार कुमार म्हणतात, 'मी अशी गाणी लिहितो, ज्याची रिंग टोन बनते. सध्या बॉलीवुड मध्ये गाण्यांतून पंजाबी टच देण्याची जोरदार स्टाइल आहे. मी पंजाब मधील आहे, तर मला जास्तच फायदा होत आहे. मी हिंदी देखील लिहितो तर ते पंजाबी वाटते. '

माझ्या गाण्यातून तर पंजाबचा सुंगध येतो ?

'फारच सहजतेने पंजाबी आणि इंग्लिश मिक्स करुन मी गाणं बनवितो. माझ्या गाण्यातून पंजाबचा सुंगध येतो. काही लोकांनी माझ्या बरोबर ह्यासाठी काम केले नाही, कारण माझ्या बोलण्यातून पंजाबीपणा आहे. काही कॉर्पोरेट प्रॉडक्शनवाल्यांनी माझ्या पंजाबीपणा मूळेच माझ्या बरोबर काम करण्यास उत्सुकता दाखविली नाही. ह्यामुळेच काही मोठे चित्रपट माझ्या हातातून निघून गेले, परंतु ह्याबद्दल मला काहीच वाटत नाही.’

गाणं तेव्हाच लोकांना आवडते आणि चालते, जेव्हा ते मनापासून लिहिले जाते  ?

'कोणतेही गाणं तेव्हाच लोकांना पसंत येते आणि चालते, जेव्हा ते मनापासून लिहिले जाते. चित्रपट केसरी मध्ये मी एक गाणं लिहिले आहे, ज्यांचे बोल आहेत सानू कहंदी है..., केसरी तर एक वेगळ्या जमान्याचा सिनेमा आहे, परंतु ह्या गाण्यांमध्ये मी इंग्रेजीचा उपयोग केला आहे, एक वेळ ऐकल्यावर तुम्हांला ते समजणार नाही.’

ये दुनिया पित्तल दी, चिट्टियां कलाइयां, सूरज डूबा, मैं हूं हीरो तेरा... सारखी अनेक गाणी लिहिली आहे ?

'माझं पहिलं गाणं होते 'इश्क तेरा तड़पावे', हे गाणे सर्वांना फारच आवडले, ह्यानंतर मला भरपूर कामे मिळायला लागली आणि मी मां का लाडला बिगड़ गया..., दिल्ली वाली गर्लफ्रेंड, जो भेजी थी दुआ... , तेनु इतना मैं प्यार करूं, तू जो नजरों के सामने, मेरे बिना मैं, मैं तो नहीं इंसानों में, तुझे भुला दिया, सुबह होने न दे, जिंदगी में कभी कोई आए न रब्बा, बेबी डॉल, तेरा यार हूं मैं, ये दुनिया पित्तल दी, चिट्टियां कलाइयां, सूरज डूबा, मैं हूं हीरो तेरा... सारखी अनेक गाणी लिहिली.'

कालांतराने गाण्याचे वय कमी होत चालले आहे?

'पहिले जेव्हा लोक गाणं लिहिण्यासाठी येत असे, तेव्हा विचारत असे कि गाण्यांचा अंतरा काय आहे, आज विचारतात कि गाण्यांची हुक लाइन काय आहे. कधी-कधी गाणं एका लाइन मध्ये लपटले असे वाटते. कालांतराने गाण्याचे वय कमी होत चालले आहे, ह्याचे कारण आहे एकाच वेळी बाजारात शेकडो गाणी येणे.’

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर