मधु, कृष्णा अभिषेक, कायनात अरोरा, रजनीश दुग्गल आणि अन्य कलाकार दिग्दर्शक मनोज शर्मा यांच्या तीन कॉमेडी चित्रपटांच्या मुर्हूतासाठी आले.
निर्माता कमल किशोर मिश्रा आणि लेखक-दिग्दर्शक मनोज शर्मा ने एकाच वेळी एक नाही तर चक्क तीन कॉमेडी हिंदी सिनेमे सुरु केले, त्यातील दोन सिनेमे हॉरर कॉमेडी आहेत. वन एंटरटेनमेंट फ़िल्म प्रोडक्शंस व प्राची मूवीजच्या बैनर खाली हे चित्रपट बनत आहे. मधु, रजनीश दुग्गल, रोहन मेहरा, कायनात अरोरा, गोपी भल्ला, एकता जैन व असरानी चित्रपट खल्ली बल्ली मधील कलाकार मुर्हूतासाठी आले. चित्रपट भूतियापा मधील कलाकार कृष्णा अभिषेक, सुगंधा मिश्रा, राजीव ठाकुर, राज ज़ुत्शी, राकेश श्रीवास्तव देखील मुर्हूतासाठी आले आणि तीसर चित्रपट फ्लैट नंबर ४२० मधील कलाकार मनोज पाहवा व बृजेन्द्र काला आले होते. सर्व कलाकारांनी ने मीडिया बरोबर चर्चा केली आणि दिग्दर्शक मनोज शर्मा यांची फारच प्रशंसा केली. खली बली चे चित्रिकरण १७ मे पासून सुरु होणार आहे मुंबई व लखनऊ मध्ये. त्यानंतर एका-एका चित्रपटांचे चित्रिकरण सुरु होईल. मधु ने मीडिया बरोबर वार्तालाप करताना सांगितले कि चित्रपटांची कथा ऐकताच मी काम करण्यासाठी होकार दिला. मधु ने हसत-हसत हे देखील सांगितले कि मला हे देखील माहित नाही कि मी आठ वर्षापासून हिंदी सिनेमात काम केले नाही.
Comments