चित्रपट स्वातंत्र्याची एसी तैसी

दिग्दर्शक रमेश मोरे यांनी अल्पवधीचत मराठी चित्रपट सृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे या आधीचे अकल्पित, सविता बानो, पहिलं पाऊल, सलाम, उदे ग अंबाबाई व हल्लीचाच महासत्ता या चित्रपटांनी याचा प्रत्यय रसिकांना दिला आहे. त्यांचा स्वातंत्र्याची एसी तैसी हा वेगळा चित्रपटही त्यांची विषय वैविधता सिद्ध करतो. आजच्या आधुनिक वेगवान आणि महासत्तेकडे वाटचाल करणा-या युगात त्या पारिवारिक नातेसंबंध आणि स्वताच्या उन्नतीसाठी धडपडणारा युवा वर्ग व त्यांचा परिवाराकडे पहाण्याचा दृष्टीकोन या आशयावर हा चित्रपट बेतला आहे. ही कथा आहे मोहन जाधव आणि त्याचे दोन दोस्त शाम व जानू ह्यांच्या परिवारांची. मोहन जाधव रिटायर्ड झाला आहे. व त्यांच्या पत्नीच निधन झालं आहे. अशा वेळी आपल्या पत्नीचे पहिलं भरणी श्राद्ध आपल्या मुलांबरोबर एकत्रपणे करावं ही त्यांची इच्छा पण त्यांच्या चारही मुलांना यासाठी वेळ नाही. त्यांची मुलं श्राद्ध म्हणजे एक इन्वेट समजतात व आपल्या धर्मातल्या रुढी परंपरा श्रद्धांना विज्ञानाच्या मापदंडातून तोलतात. मशिनवर काम करणारा आजचा माणूस आता मशिन बनला आहे व अत्याधुनिक विज्ञान आणि त्यात मानवी नात्यांची होणारी गणचेपी यांचा ठोकताळा प्रभावी कथानकाच्या माध्यमांतून यात मांडण्यात आली आहे. याचं लेखन आणि दिग्दर्शन रमेश मोरे यांचचं असून यांनी केले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात असमान्य डॉ. नंदकुमार तासगावंकर आणि त्यांच्या पत्नी वंदना नंदकुमार तासगावंकर यांनी फोर अशेस इंटरटेनमेंटच्या बैनरखाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यातील समर्पक पूरक अशा गीतरचना यशश्री मोरे यांच्या असून सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांनी त्या संगीतबद्ध केल्या आहेत. डोळ्यातून हद्यापर्यत पोहोचणारे छायाचित्रण अनिकेत खंडागळे ह्यांचे असून वसंत कुबल ह्यांनी हा चित्रपट संकलित केला आहे. ह्याची कला गजा तांबे, ध्वनी अप्पा तारकर ह्यांची आहे. ह्यात अष्टपैलू अभिनेता अरूण नलावडे ह्यांनी मोहन जाधवची मुख्य व्यक्तिरेखा अतिशय प्रभावशालीपणे साकारली असून त्यांना सुलभा देशपांडे, अमिता खोपकर, उदय सबनिस, जयंत सावरकर, अविनाश नारकर, मिलिंद शिंदे, सुशांत शेलार, शैलेश दातार, अजिंक्या जोशी, एश्वर्या नारकर ह्यांनी साथ दिली आहे. एका रिटायर्ड बापाचा आक्रोश आणि त्याची घुसमट दाखवणारा हा चित्रपट मुंबई, पुणे,स कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद येथे १३ नोव्हेंबर पासून एकाच वेळी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA