चित्रपट चल गजा करु मजा प्रदर्शनासाठी सज्जा
विवेक पांडकर आणि मानसिंग पवार निर्मित, ए लोखंडवाला प्रोडक्शन प्रस्तुत चल गजा करु मजा हा मल्टिस्टारर चित्रपट प्रदर्शनसाठी सज्ज आहे. विवेक पांडकर यांनी आतापर्यंत आर्य चाणक्या, मी माझ्या मुलांचा, सागरा प्राण तऴमऴला, ही श्रीची इच्छा, शांतेचे कार्ट चालू आहे, अशी अनेक लोकप्रिय नाटक केल्यानंतर आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात हे त्यांच पहिले पाऊल आहे. या चित्रपटात भरत जाधव प्रथमच लावणी नृत्य सादर करणार आहे. या चित्रपटातील गाणी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, उत्तर केऴकर, त्यागराज खाडीलकर, अमेय दाते, प्रविण कुंवर यांनी गायली आहेत. माणूस किती ही मोठा झाला तरीही आईचे ऋृण फेडू शकत नाही हे दिग्दर्शकाला या चित्रपटातून दाखवायचे आहे आणि प्रतिभा दाते ह्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळतील.
ह्या चित्रपटात भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, विजय गोखले, अशोक शिंदे, रविंद्र बेर्डे, विजू खोटे, उषा नाईक, प्रतिभा दाते, दिपा चाफेकर, किशोर महाबोले, मृणालीनी जांभळे असे कलाकार आहेत.
ह्या चित्रपटात भरत जाधव, सोनाली कुलकर्णी, विजय गोखले, अशोक शिंदे, रविंद्र बेर्डे, विजू खोटे, उषा नाईक, प्रतिभा दाते, दिपा चाफेकर, किशोर महाबोले, मृणालीनी जांभळे असे कलाकार आहेत.
Comments