चित्रपट रैगींग चा मुहुर्त संपन्न
अमृता आर्टसच्य बैनरखाली मुरली लालवाणी निर्मित व बिग बॉलीवुड पिक्चर्स (बाबू) प्रस्तुत मराठी चित्रपट रैगींग चा मुहुर्त नुकताच अंधेरी येथील बॉलीवुड रेकॉर्डिंग स्टुडिओ येथे गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गीत ध्वनीमुद्रणाने संपन्न झाला. आफताब यांनी लिहिलेल्या गीताला विक्रम या नव्या दमाच्या संगीतकाराने संगीत दिले आहे.
रैगींग या चित्रपटाचे दिग्दर्शन महेंद्र देवळेकर करणार आहेच. लवकरच सर्व कलावंताची निवड पूर्ण करुन डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात चित्रपट सेटवर जाईल. या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापुर, सातारा आणि मुंबई या ठिकाणी तीन सत्रात चित्रपट पूर्ण करण्यात येईल.
Comments