कॉमेडी चित्रपट लागली पैज


कुबेर प्रोडक्शन प्रस्तुत आणि लोकेश मुव्हीज निर्मित बैनरखाली निर्माते विजय बेल्लद व मंगेश जावळे निर्मित आणि मिलिंद शिंत्रे दिग्दर्शित लागली पैज हा विनोद प्रधान मराठी चित्रपट एकाच वेळी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, सातारा, औरंगाबाद, सोलापूर येथे शुक्रवार दिनांक २० नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

लागली पैज अर्थातच पैजेवर आधारित आहे. आपण दुस-यापेक्षा बुद्धिमान, हुशार, शहाणा, श्रेष्ठ अशा किती तरी अहम साठी माणसं पैज लावतात पण या चित्रपटात दुस-याच्या भल्यासाठी दुस-याचं चांगलं होण्यासाठी पैज लावण्यात येते व अशीही आगळी वेगळी पैजेची कथा पटकथा-संवाद दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांचीच आहे.

लागली पैज ही कथा आहे रमाकांत नावाच्या बैंकेत रिकव्हरी एजेटंच काम करण्या-या व्यक्तिची. ह्याला दोन मुलं आहेत. रमाकांतला पैज लावायचं व्यसन आहे. व तो एक ही पैज हरलेला नाही. त्याच्या मुलीचं दिपालीचं आनंद नावाच्या मुलावर प्रेम आहे. पण काही परिस्थितिमुळे आनंद आणि दिपालीच लग्न होणार नाही. असं संकट निर्माण होतं. त्यावेळी त्या दोघांचा विवाह व्हावा म्हणून रमाकांतचे सहकारी रमाकांत बरोबर एक वेगळीच पैज लावतात व ही पैज जिंकण्यासाठी रमाकांतला काय काय उचापाती कराव्या लागतात किती अडचणीना तोंड द्यावं लागतं याचं खुशखुशीत सादरीकरण ह्या चित्रपटात करण्यात आलं आहे. याची गीतरचना मिलिंद शिंत्रे यांची असून संगीत अभिजीत कवठाऴकर ह्यांच आहे. सुप्रसिद्ध गायिका उषा उथ्थप हिने मराठीत प्रथमच गीताला आवाज दिला आहे. त्याचबरोबर आशा भोसले, शंकर महादेवन यांनी ही आपला आवाज दिला आहे.

चित्रपट लागली पैज मधील मुख्य कलाकार मोहन जोशी, अरूण नलावडे, स्मिता तळवलकर, सतिश तारे, किशोरी आंबिए, मिलिंद गुणाजी, प्रिया बेर्डे, सुनिला करंबळेकर, समीर धर्माधिकारी, दिपक शिर्के, राघवेंद्र काडकोळ, राहूल सोलापुरकर, अमेय वाघ, हेमंत ढोमे, श्रृति मराठे त्याचबरोबर माजी क्रिकेटपट्टू विनोद कांबळी याने चित्रपटातील आयटम सांग मध्ये गायलाय व नाचलाय हे एक मुख्य वैशिष्ट्य आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर