एक दुजासाठी चे क्लायमैक्स शूट

श्री गौरीशंकर प्रोडक्शन प्रस्तुत सुनिता मैस्करंस निर्मित एक दुजासाठी मराठी चित्रपटाचे क्लायमेक्सचे शूटिंग बसरा स्टुडिओ कांदिवली (पूर्व) मुंबई येथे करण्यात आले. कलाकार निरंजन जोशी, दिपाली पानसरे, वरद चव्हाण, प्रिया गमरे, कुलदिप पवार, प्रिया बेर्डे यांच्यावर चित्रित करण्यात आले.
या चित्रपटात पाच गाणी श्रीकांत प्रभु यांनी लिहिली असून जॉन मैडी यांनी संगीतबद्ध केली आहेत. स्वप्निल बांदोडकर, अमेय दाते, मदन शुक्ला, नेहा दुबे, जॉन मै़डी या सुप्रसिद्ध गायकांनी ती गायली आहेत.
हा चित्रपट प्रेम कथेवर आधारित आहे. यातील दोन जोडप्याचे एकमेकांवर अतुट प्रेम असते. पण त्यांच्या आई वडिलांचा या प्रेमाला विरोध असतो व ते या वादातून आपल्या प्रेमाचा विजय कसा मिळलतात.. हे लवकरच आपल्याला श्री गौरीशंकर प्रोडक्शन प्रस्तुत एक दुजासाठी या चित्रपटातून पहावयास मिऴेल. या चित्रपटाचे चित्रिकरण महाबऴेश्वर, डहाणू व मुंबई येथे झाले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर