बहारदार लावण्यांचा नजराणा मुजरा माझा लावणीला


नाटक-चित्रपट पाहणा-या रसिक प्रेक्षकांना जेव्हा लावणी या लोककला प्रकारातील लावण्य आणि लज्जत उमजू लागली तेव्हा नाटक-चित्रपटांएवजी तो खास लावण्यांचा बाज-साज असलेले कार्यक्रम पाहू लागला आणि रसिकांची अशी उत्सफूर्त व लक्षवेधी दाद मिऴू लागताच रंगभूमि रंगमंचावर अशा कार्यक्रमांची चलती वाढली. आज मराठी रंगभूमिवर अशा कार्यक्रमांचा चांगलाच बार उडालेला असताना आरवी थिएटर्स निर्मित मुजरा माझा लावणीला असा एक आगऴा-वेगऴा आणि नावाप्रमाणेच लावणी या पारंपरिक कला प्रकाराला मुजरा करणारा एक बहारदार कार्यक्रम रसिकांच्या भेटीला आला आहे.
तमाशा या ग्रामीण मनोरंजक कार्यक्रमांतर्गत सादर होणा-या लावणी या नृत्य प्रकाराला आज तसे सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत. मात्र जनमानसात या प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काही कलावंतीनीच्या तीन-तीन पिढ्या कामी आलेल्या आहेत. त्यांच्या या त्यागाचे मोल जाणूनच आरवी थिएटर्स कडून या मुजरा संकल्पना आज रंगमंचावर सादर करण्यात येत आहे. निर्माते विजय मनोहर यांनी संतोष लिंबोरे यांच्या संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या मुजरा माझा लावणीला आपल्या आरवी थिएटर्स तर्फे रंगमंचावर आणले आहे. या बहारदार आणि ऋण निर्देशक लावणीच्या मुज-याचे नृत्य दिग्दर्शन संतोष आंब्रे, नितेश बोदडे यांनी केले आहे तर संगीत संयोजन अमोल परेश यांनी केले आहे.
लावणीला असा मुजरा करताना या मराठी मातीतील अभिजात विनोद प्रकार असलेल्या बतावणी चा स्वाभाविक पणे आधार घेतला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन आणि बतावणी अमीत काकडे आणि महादेव सावंत यांनी केले आहे.
लावणीच्या या बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण करत आहेत धनुश्री दळवी, माधुरी आचरेकर, सुजाता पांचाळ, स्वाती तांदळळे, सुजाता कांबळे, श्वेताली वैदेही, मयुरी, विणा, करुणा, रवी, मंगेश, यामीनी रागा आणि देवयानी या नृत्य शमशेर..या प्रत्येक लावण्यवतीची एक खास अदा आहे आणि त्यानुसारच त्या आपली लावणी दिलखेचरकित्या सादर करित आहेत. हंसा वाडकर, जयश्री गडकर, मधु कांबीकर आदी नृत्यसम्राज्ञीनी एके काळी रंगमंच आणि रुपेरी पडद्यावर गाजवलेल्या लावण्यांना मुजरा करतानाच संतोष लिंबोरे यांनी लावण्यांच्या आधुनिक साज-श्रृंगारालाही हा मानाचा मुजरा केला आहे. एक हौस पुरवा महाराज, बुगड़ी ग माझी सांडली ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, मी लाडाची मैना, पाव्हणा अलिकडचा, कैरी, नाद करायचा नाय, ह्यो हयो ह्यो पाव्हणा, दाजीबा ते आजच्या चला जेजुरीला जाऊ अशा विविधरंगी व बहुढंगी लावण्यांची मेजवाणीच रसिक प्रेक्षकांना मुजरा माझा लावणीला या कार्यक्रमातुन मिळणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष खेळ सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा आदी ठिकाणी होत असुन त्याला रसिक प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर