मुंबई मध्ये मुकेश खन्ना यांनी ३ डी एनिमेटेड सीरीज "शक्तिमान" चे पोस्टर लांच केले

"शक्तिमान" च्या रूपात लोकप्रिय अभिनेता मुकेश खन्ना एक वेळ पुन्हा "शक्तिमान" च्या रुपात अवतरणार आहे. "शक्तिमान" चे एनिमेटेड सीरीजच्या रूपात येणार आहे, त्यामध्ये निश्चितपणे मुकेश खन्नाचा आवाज असेल आणि त्यामध्ये त्यांची अदाकारी देखील पहावयास मिळणार आहे. मुंबई मध्ये मुकेश खन्ना यांनी एनिमेटेड सीरीज शक्तिमान चे पोस्टर लॉच केले, तेव्हा ह्या सीरीज चे डायरेक्टर नवीन वाधवा, वर्डसवर्ड क्रियेशन्स चे मनरेश मल्होत्रा व कैथरीन जॉन देखील उपस्थित होते. मुकेश खन्ना यांनी सांगितले कि लवकरच एनीमेशन सीरीजचा टीजर लॉन्च केला जाणार आहे. मला एनीमेशन करणा-या संपूर्ण टीम वर विश्वास आहे कि ते उत्तम प्रकारे हे बनविणार आहे. ही सीरीज लवकरच येणार आहे. हे कोणत्या टीवी चैनल अथवा कोणत्या ओटीटी प्लेटफॉर्म वर रिलीज होणार. मुकेश खन्ना ने हे देखील सांगितले कि भीष्म पितामह व शक्तिमान ह्या दोन्ही कैरेक्टर ने मला ओळख दिली आहे. मी 'भीष्म पितामह' ची इमेज तोडण्यासाठी शक्तिमान मध्ये काम केले होते. ‘शक्तिमान’ टीवी वर १५ वर्षे चालला. लोक मला ख-या नावापेक्षा शक्तिमान नावानेच जास्त ओळखतात व ह्याच नावाने संबोधितात. मला फारच आनंद होत आहे कि 'शक्तिमान' पुन्हा एक वेळ येत आहे. मला असे वाटते कि "शक्तिमान" द्वारे मुलांना मैसेज दिला जाऊ शकतो. "शक्तिमान" मध्ये आजच्या युगातील गोष्ट असेल, परंतु आत्मा तोच राहणार आहे. देशात आज मुलींबरोबर जे काही चालले आहे ते पाहून मुकेश खन्ना यांच्या मनात फारच चिंता आहे आणि मन देखील विचलित होत आहे. ते म्हणाले कि आपली सभ्यता, संस्कृति बरोबर महिलांचे रक्षण केले पाहिजे, परंतु ही जी राक्षसवृत्ती आली आहे, त्याविरुद्ध एक्शन घेण्याची आवश्यकता आहे. मेणबत्ती जाळण्याची आपली संस्कृति नाही आहे. रेपिस्टच्या विरूद्ध कडक एक्शन घेतली पाहिजे. कडक कायद्याची येथे आवश्यकता आहे. वाईट माणसांच्या मनात कायद्याचे असे भय जागविण्याची आवश्यकता आहे कि तो असे करण्याचा विचार देखील करु शकणार नाही.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे