संगीतम चैरिटेबल ट्रस्ट चे सौरभ दफ्तरी द्वारा आयोजित रेहमतें ५ म्यूजिक कन्सर्ट

संगीतम चैरिटेबल ट्रस्ट चे सौरभ दफ्तरी द्वारा आयोजित रेहमतें ५ म्यूजिक कन्सर्ट सायन स्थित षणमुखानंद हॉल मध्ये संपन्न झाला.

आपले आवडते गायक – शान, हरिहरन, अंकित तिवारी आणि अनुप जलोटा सोबत अनुभवी संगीतकार - चंद्रकांत निंबाळकर, उषा रेगे, रागिनी जुहारी, विनोद भट्ट, रविंद्र रावण रावळ, मधू मधालकर, दीपक भोरापकर आणि इतर दिग्गजांनी मंचावर शानदार परफॉर्मेंस केला. षणमुखानंद हॉल मध्ये रेहमतें ५ म्यूजिक कन्सर्ट समारंभ संपन्न झाला.


संगीतम चैरीटेबल ट्रस्टचे सौरभ दफ्तरी यांनी आयोजित कार्यक्रमात गेल्या पाच वर्षांपासून संगीत क्षेत्रातील कलाकारांना आर्थिक सहाय्य देण्यात आले आहे. या कार्यक्रमात लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध गायक हरिहरन, शान, अंकित तिवारी आणि अनुप जलोटा ने शानदार परफॉर्मेंस केला. ऑडिटोरियम मध्ये लेस्ली लुईस, सलीम मर्चंट, सुरेश वाडकर, अभिजीत भट्टाचार्य, अलका याज्ञिक, जतिन ललित, मदन पाल, ब्राईट आउटडोअर चे योगेश लखानी, महाराष्ट्र टुरिझम चे प्रिन्सिपल सेक्रेटरी विजय कुमार व अन्य खास पाहुणे उपस्थित होते.

महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संगीतकारां बद्दल काही आवश्यक बाबींचा उल्लेख केला. स्टेजवर ज्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांच्या चेहऱ्यावर हसू पहाण्याजोगे होते. याप्रसंगी मदन पाल यांनी लिहिले एक पुस्तक देखील रिलीज करण्यात आले. ई-बिझ एंटरटेनमेंट इंडिया प्रा. लिमिटेड ने हा म्यूजिक कॉन्सर्ट होस्ट केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर