केंद्रीय मंत्री श्रीरामदास आठवले यांचा मुलगा जीत चे मराठी चित्रपट इंडस्ट्रीत पर्दापण


सिद्धार्थ एंटरप्राइजेज व अंजली एंटरप्राइजेज द्वारा प्रस्तुत नवा मराठी चित्रपट सोन्या चा धमाकेदार मुहूर्त केंद्रीय मंत्री श्रीरामदास आठवले यांच्या शुभहस्ते बोरीवली पश्चिम स्थित बे व्यू बेनक्वेट हॉल मध्ये चित्रपटांचे कलाकार व यूनिट सोबत पार पडला. चित्रपटांचे दिग्दर्शक मुरली लालवाणी आहे तर ह्या चित्रपटांत अंडर १४ क्रिकेट टीमची कथा असून ह्यामध्ये श्रीरामदास आठवले यांचा मुलगा जीत मुख्य भूमिका साकारत आहे व जीतच्या आईची भूमिका अभिनेत्री निशा परूळेकर करत आहे.

श्रीरामदास आठवले यांच्या हस्ते मुहूर्त क्लेप केला व चित्रपटांची शूटिंग सुरु झाली. ह्यावेळी श्रीरामदास आठवले म्हणाले कि मी नेता आहे तर माझा मुलगा अभिनेता बनला आहे, ही फारच सुखद व आनंदाची बाब आहे. जीतच्या फिल्मी दुनियेतील एंट्री बद्दल त्याला शुभेच्छा.

अभिनेत्री निशा परूळेकर म्हणाली कि ह्या चित्रपटांत मी एक सशक्त व कर्तबगार आई बनली आहे व मुलाचे क्रिकेट मध्ये भवितव्य घडविण्यासाठी भरपूर कष्ट घेते व आपल्या मुलाचे स्वप्न हालअपेष्टा सोसून पूरे करते.
चित्रपटांचे दिग्दर्शक मुरली लालवाणी यांनी सांगितले कि हा चित्रपट बनविणे माझ्यासाठी एक चैलेंज आहे व हा सिनेमा उत्तम प्रकारे बनविणे हेच आता माझे ध्येर्य आहे.


Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर