साहित्य सत्कार सोहळा

आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी यांचा साहित्य सत्कार सोहळा
१ ते १० जनवरी रोजी सोमैय्या ग्राऊंड, सायन मध्ये होणार आहे

साहित्य सत्कार सोहळ्या मध्ये आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तक 'मारूं भारत, सारूं भारत'  चा लोकार्पण सोहळा १० जनवरी, २०१६ रोजी  मुंबई च्या सायन स्थित सोमैया ग्राऊन्ड वर होणार आहे. दहा दिवसांच्या ह्या सुवर्णमय सोहळ्याचे नाव यात्रा ३०० ठेवले आहे, त्यामध्ये सकारात्मक आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होणार आहे. यात्रा ३०० चा संदेश आहे 'फिल द चेंज'. ह्या इवेंट चे आयोजन चुन्नाभट्टी सायन स्थित सोमैय्या ग्राऊंड वर केले आहे.

ह्या सोहळ्या साठी मुख्य पाहुणे श्री मोहनजी भागवत (प्रमुख, आरएसएस), सुमित्रा महाजन (लोकसभा स्पीकर), राजनाथ सिंह (गृहमंत्री, भारत सरकार), स्मृति इरानी (शिक्षा मंत्री, भारत सरकार), देवेन्द्र फडवणीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), आनंदीबेन पटेल (मुख्यमंत्री, गुजरात), डॉ. रमण सिंह (मुख्यमंत्री छत्तीसगढ़), विजय दर्डा (राज्यसभा सांसद), राम शिंदे (गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य), गोपालजी शेट्टी (सांसद), किरीट सोमैया (सांसद), मंगलप्रभातजी लोढ़ा (विधायक), देवजी एम पटेल (सांसद, जालोर), भूपेन्द्र सिंह चुडास्मा (शिक्षण मंत्री, गुजरात) उपस्थित राहणार आहे.

साहित्य सत्कार समारंभात अनेक प्रकारचे आकर्षण आहे आणि हा सोहळा १ जानेवारी ते १० जानेवारी २०१६ पर्यंत होणार आहे. ह्या १० दिवसांच्या कार्यक्रमात अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. फिल्म झोन जीवन यात्रा, फ्लाय झोन साहित्य यात्रा, फन झोन आनंद यात्रा, फ्लेम झोन परिवर्तन यात्रा सारखे काही यात्राचे  दर्शन ह्या समारंभात होणार आहे. रजवाडी नक्शीकामाने सजलेला उत्तम कलाकृति केलेला ४०० फुट लांब व ६० फुट उंच असे भव्यातिभव्य प्रवेशद्वार आह, त्यामध्ये शंखेश्वर तीर्थस्थान आहे. विशाल प्रवचन मंडप, मां सरस्वती मंदिर, साधु-साध्वीजी साठी कुटिर आणि सर्व पाहुण्यांसाठी भोजन व्यवस्थेसाठी विशाल भोजन मंडप उभारला आहे.

साहित्य सत्कार सोहळ्याच्या दहा दिवसाच्या कार्यक्रमाची रुपरेखा अशा प्रकार आहे - १ जानेवारी रोजी उद्धाटन समारोह, २ जानेवारी रोजी युवा पिढी साठी आचार्यश्री चा उष्मापूर्ण संवाद उत्सव, ३ जानेवारी रोजी सरस्वती माता च्या उपासनेचा उत्सव, ४ जानेवारी रोजी प्रभु पार्श्वनाथ जन्मकल्याणक व पूज्य गुरुदेवश्री च्या जन्मदिवसाचा उत्सव, ५ जानेवारी रोजी पू्ज्यश्री च्या प्रवचनातून स्वताच्या चूका सुधारण्याची संधीचा उत्सव, ६ जानेवारी रोजी स्वताला परिवर्तित करण्याचा उत्सव, ७ जानेवारी रोजी समाजात बहुमूल्य योगदान देणा-या व्यक्तिच्या प्रति आभार प्रदर्शित करण्याचा उत्सव, ८ जानेवारी रोजी जीवनाला प्रसन्नतामय बनविण्याचा व सुंदर मार्गदर्शन प्राप्त करण्याचा उत्सव, ९ जानेवारी रोजी आचार्यश्री च्या अवर्णनीय उपकारांच्या प्रति आभार अभिव्यक्ति करण्याचा उत्सव, १० जनवरी, २०१६ रोजी सकाळी ९ वाजता आचार्य विजय रत्नसुंदरसूरीश्वरजी द्वारा लिखित ३०० वे पुस्तक 'मारूं भारत, सारूं भारत' चा लोकार्पण समारंभ होणार आहे. हे पुस्तक हिंदी, गुजराती, मराठी व इंग्रजी भाषेत आहे. साहित्यसृजन च्या इतिहासा मधाली हे सोनेरी पान आहे. ह्या समारंभा साठी लाखोंच्या संख्येत भक्तगण उपस्थित राहणार आहे.

ह्या ऐतिहासिक क्षणाला अविस्मरणीय बनविण्यासाठी 'साहित्य सत्कार समारोह समिती' ने एका भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे. विश्वास जरुर करा कि ह्या सोहळयात येऊन तुमच्या स्वता मध्ये परिवर्तनाचा अनुभव होणार आहे, स्वजीवनाला अधिक आनंदमई बनविण्याचा अदभुत मार्गदर्शन प्राप्त होणार, तर चला यात्रा ३०० मध्ये आणि अनुभव घ्या एका नविन परिवर्तनाचा.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर