चित्रपट आणि संगीत इंडस्ट्री मधील पाहुणे गायक अमित कुमार यांच्या संगीत कैरियर चे ५० वर्ष सेलेब्रेट करण्यासाठी सायन च्या षण्मुखानंद हॉल आले



 अमित कुमार यांनी आपले पिता किशोर कुमार च्या सोबत १९६५ मध्ये आपले संगीत कैरियर सुरु केले होते. आपल्या वडिलां प्रमाने अमितला गाण्याबद्दल प्रेम होते और लहानपणी कोलकात्ता मध्ये दुर्गा पूजेच्या कार्यक्रमात गाणं गात असे. एकदा असे झाले कि बंगाली अभिनेता उत्तम कुमार द्वारा आयोजित दुर्गा पूजा कार्यक्रमात भाग घेतला होता आणि लोकांनी वन्स-मोर म्हणून पुन्हा-पुन्हा गाणी गायला लावली व ही बातमी आईला समजली, तेव्हा आईने किशोर कुमार कडे तक्रार केली कि तुमचा मुलगा फिल्मी गीत गातो. त्यानंतर किशोर कुमार ने त्याला मुंबईला नेण्याचा निर्णय घेतला. ते त्याला बाल गायक म्हणून ब्रेक देणार होते. ते चित्रपट होते दूर गगन की छांव में आणि दूर का राही’. गाण्याचे बोल होते आ चलके तुझे, मैं लेके चलूं’, किशोर कुमार यांनी आपल्या अकरा वर्षाचा पुत्र अमित कुमार बरोबर ही गाणी गायली.
साल १९९४ मध्ये आर डी बर्मन यांच्या मृत्यु पश्चात अमित कुमार हे फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेले, कारण त्यांच्या बरोबर एक अटूट नातं होते. परंतु त्यांनी आर्केस्ट्रा मध्ये गायन सुरु ठेवले और आतापर्यंत सुरु आहे. त्याचबरोबर अमित कुमार यांनी काही चित्रपटांतून काही उल्लेखनीय गाणी गायली आहेत – आंधी, आप के दिवाने, खट्टा मिठा, गोल माल, देस परदेस, गंगा की सौंगध, दिवानगी (१९७६), दुनिया मेरी जेब में, परवरिश, हमारे तुम्हारे (१९७९) आणि बातों बातों में. त्यांनी लता मंगेशकर सोबत चित्रपट बातों बातों में – उठे सबके कदम आणि चित्रपट दुनिया मेरी जेब में देख मौसम के राही है गाणं गायले. त्याचबरोबर आशा भोंसले सोबत चित्रपट लाल खोटी मध्ये ढल दिन कैसे गाणं गायले, जे त्याकाळी फारच लोकप्रिय झाले होते. साल १९८० मध्ये अभिनेता फिरोज खान द्वारा निर्मित चित्रपट कुर्बानी चे लोकप्रिय गाणं लैला ओ लैला अमजद खान वर चित्रित केले होते, त्यासाठी अमित कुमार ने आवाज दिला होता.
आता अमित कुमार आपल्या गायन कैरियर चे ५० वर्ष सेलेब्रेट करत आहेत. अमित कुमार अन्य गायकांसोबत सायन, किंग सर्कल स्थित षण्मुखानंद हॉल मध्ये लाइव परफॉर्म सादर केला. ५० वर्षाच्या गोल्डन ईयर च्या संगीतमय कार्यक्रमात अमित कुमार सोबत म्यूजिक डायरेक्टर बप्पी लाहिरी, कविता कृष्णमूर्ति, अनुराधा पौडवाल, सपना मुखर्जी, सुमीत कुमार, सुदेश भोंसले, सुरेश वाडकर, सिद्धांत भोंसले, शैलेजा सुब्रमण्यम, बाबुल सुप्रियो प्यारेलालजी ,एकता जैन ,ब्राईट के योगेश लखानी, जीतेन्द्र  आणि जॉनी लीवर उपस्थित होते. गोपकुमार पिल्लै यांनी पीपल आर्ट्स सेंटर साठी ह्या इवेंटचे आयोजन केले होते.

Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma