सरस्वती नंदन परम पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसुरी महाराज साहेबांचा परिचय
परम
पूज्य आचार्य विजय रत्नसुंदरसुरी हे कोणत्याही परिचयाचे मोहताज नाही आहे. ते ही-या
प्रमाणे मनमोहक आणि मनुष्याची सुंदरता व आकर्षणशीलताच्या रुपात भारत देशातील महान जैन
संत आहे. त्यांनी आतापर्यंत विदेशी यात्रा केली नाही, तरी देखील त्यांचे विचार आणि अनुयाई संपूर्ण जगात
आहेत, ज्यांची कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही आहे.
आचार्य
महाराज यांना देवी सरस्वती चा आशीर्वाद प्राप्त आहे, म्हणूनच त्यांनी आतापर्यंत आपल्या मातृभाषेत (गुजराती) २९८ पुस्तकें लिहीली
आहे. त्यांना सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार ‘गोल्डन बुक ऑफ
वर्ल्ड रिकॉर्ड्स' देखील मिळाला आहे. त्यांची काही पुस्तकें इंग्रजी, हिंदी,
मराठी,
सिंधी,
उर्दू,
फ्रेंच इत्यादी भाषेत अनुवादित केली
आहेत व संपूर्ण देशात ६ मिलियन पुस्तकें वितरीत केली आहे. त्यांचे शब्द राष्ट्रीय आणि
अंतरराष्ट्रीय स्तरावर अरिहंत टीवी,
पारस टीवी व सोहम टीवी च्या माध्यमातुन
ऐकले जातात. काही लोकांना त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून जीवनात लाभ मिळाला आहे.
फक्त बुद्धिक्षमतेमुळे
समाजात बदल साधता येत नाही, विचारांची स्पष्टता, विज्ञानासोबत अध्यात्मवादाचे संतुलन झाले तर समाजामध्ये बदल होऊ शकतो.
त्यांच्या
अनुसार, आनंदी मनुष्यांच्या काही
आवश्यकता असतात आणि दूस-याच्या आवश्यकता नसतात. एक जैन संत असल्यामुळे, त्याची पवित्रता सोबत कठोर नियम व कायदे आहेत. ते नग्न पायी चालतात आणि त्यांनी
सन १९६७ पासून स्नान केले नाही, जेव्हा त्यांनी संत धर्माची दीक्षा
घेतली होती. ते पानी व भोजन सुर्यास्त ते सुर्योदया मध्ये घेत नाही. त्यांच्या मते, श्रीमंत व्यक्ति तो आहे, ज्यांच्या आवश्यकता मर्यादित
आहेत. त्याचबरोबर ते एक लेखक आणि प्रवक्ता नाही तर एक सत्यवादी प्रेरक आहेत आणि त्यांच्या
अनुशासन व समर्पण भावामुळे तुम्ही देखील अधिक सशक्त बनु शकता.
तसे पाहिले
तर, मागील चार वर्षापासून ते दिल्ली मध्ये आहेत, त्यांच्या भेटी सत्तेत असलेले नेते मंडळी आणि अन्य पार्टीच्या नेते मंडळी
बरोबर होतात आणि त्यांनी शांती पसरविण्याचा संदेशा बरोबर राष्ट्र आणि समाजाच्या हिता
साठी मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या
विचारानुसार, समाज व राष्ट्राचा विकास
तेव्हा होऊ शकतो, जेव्हा नवीन पीढीच्या मूल्यांचा वैज्ञानिक विकासाबरोबर
मन आणि शरीरामध्ये आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. आपल्या देशातील घोटाळे कर-याची चर्चा
करण्यापेक्षा खालच्या स्तरावरील लोकांच्या विकासावर जोर दिला पाहिजे.
गुरु महाराजांच्या
मते, लोक फरक करु शकतात, जेव्हा त्यांना योग्य दिशा व योग्य रस्ता दाखविला जाईल.
Comments