चिराग शाह यांचा गोसेलेब मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तयार.

सोनू निगम, श्रेया घोषाल, बप्पी लाहिरी, शान सारख्या काही गायकांसोबत पाच शहरांची टूर योजना आखली.

GoCeleb चे संस्थापक चिराग शाह आता देखील लक्ष्मीकांत प्यारेलाल सोबत आपल्या गुजरात सिटी टूरच्या शानदार यशाच्या आधारावर काम करत आहे, ह्या मनोरंजन कंपनीचे फाउंडर नवरात्रोत्सव सोबत सुरु होणा-या आपल्या काही संगीत कार्यक्रमांची तयारी आता पासून करत आहेत.

चिराग सांगतात, "प्यारेलालजी सोबत आमच्या मागील शो चे यश अभूतपूर्व राहिले आहे आणि ह्यातूनच आम्ही प्रेरित झालो आहे कि आम्ही आपल्या भविष्यातील शो अजूनच अधिक असाधारण बनवु शकु.’’ ते पुढे सांगतात, ‘’आमच्याकडे २०१९ च्या शेवटपर्यंत प्रमुख शो ची योजना आहे. ह्यामध्ये सोनू निगम, श्रेया घोषाल, बप्पी लाहिरी, सलमान अली, जावेद अली, पंकज उधास, ललित पंडित आणि शान सारख्या काही गायकांसोबत पाच शहरांचा दौरा आहे. आता पर्यंत एकूण ४० गायकांना साइन केले आहे आणि काही रोमांचक व शानदार नवरात्रि नाइट्सची प्लानिंग देखील सुरु आहे.”

एंटरटेनमेंट फर्म च्या योजना बद्दल सांगताना, जे एक ऑनलाइन कलाकार बुकिंग पोर्टल च्या रूपात सुरु झाले, चिराग सांगतात, “गोसेलेब सोबत आमचा उद्देश्य लोकांना सर्वात उत्तम मनोरंजन देणे आहे. चित्रपटांतून लोकांना फक्त रिकॉर्ड केली गेलेली सामग्री पहावयास मिळते, परंतु लाईव शोज मध्ये त्यांच्याकडे आवड-निवड आणि गायकांसोबत मनोरंजनाचा रंगरूप बदलण्याचा पर्याय असतो. एवढचं काय तर कलाकार आपल्या स्वतःला शोच्या प्रवाहात झोकून देण्याची योजना बनवु शकतात आणि मनोरंजनाचा नियम देखील बदलू शकतात. आम्ही आतापर्यंत ३००० हून अधिक कलाकार साइन केले आहेत आणि काही अजून देखील आमच्याबरोबर जोडले जाणार आहेत.’’

हे माहित झाले आहे कि GoCeleb लवकरच एक सेलिब्रिटी मर्चेंडाइज ऑक्शन पोर्टल देखील लॉन्च करणार आहे. हा ऑनलाइन लिलाव पोर्टल प्रशंसकांना लिलावा मध्ये भाग घेणे आणि आपली आवडती व्यक्ती साठी मर्चेंडाइज तून लिलाव लावण्याची संधी देणार आहे. लिलावा मधील रकमेचा एक भाग अशासकीय संस्थांना देणगीच्या रूपात देण्यात येईल, ह्यातून समाजासाठी देखील एक योगदान होईल.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर