मराठी सिनेमा ‘भिकारी’ च्या सेट वर स्वप्निल जोशी व गणेश आचार्याची जुगलबंदी


डांस मास्टर गणेश आचार्य यांनी गणपतीची मूर्ति ४० फुट व त्याचबरोबर ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत गणपती गाणं लंबोदर तू गजानना, गजानना... ‘ गोरेगांव स्थित फिल्मसिटी येथील हैलीपैड लोकेशन वर शूट केले. ह्या चित्रीकरणासाठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, नायिका रुचा इनामदार व करैक्टर आर्टिस्ट देखील होते.
मराठी सिनेमा भिकारी चा नायक स्वप्निल जोशी यांनी गाण्याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि ह्या गाण्यांसाठी आम्ही सर्वजण मागील दोन महिन्यांपासून रिहर्सल करत आहे व त्याच रिहर्सलची मेहनत आज हे गाणं शूट करताना बघावयास मिळत आहे. गणेशजी ने माझ्याकडून उत्तम परफॉर्मस करुन घेतला आहे म्हणूनच हे गाणं जबरदस्त भव्य-दिव्य अंदाजात शूट झालं. हे गाणं शूट करताना जसा काही गणेशोत्सव सुरु आहे अस सर्वाना वाटत होता. हे गाणं हिंदी चित्रपटा सारखंच भव्य-दिव्य स्टाइलने शूट केले आहे. कोणतीही कसर सोडली नाही.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर