लोकांना करोडपती बनविणारा स्वप्निल जोशी स्वतः बनला भिकारी


कलर वाहिनी वर लोकांना करोडपति बनविणारा अभिनेता-एंकर स्वप्निल जोशी स्वतः भिकाली बनला आहे. ही बातमी शंभर टक्के खरी आहे. गणेश आचार्य यांना नवा मराठी चित्रपट भिकारी मध्ये स्वप्निल जोशी मुख्य भूमिका साकारत आहे. नुकताच ह्या चित्रपटांचा मुर्हूत बॉलीवुडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते जेडब्ल्यू मैरियट ह्या पंचतारांकित होटेल मध्ये संपन्न झाला.

डांस मास्टर गणेश आचार्य यांनी ह्या चित्रपटांविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि हा मराठीतील आगळा-वेगळा शैलीचा चित्रपट आहे व ह्यामध्ये कलाकारांची फौज पहावयास आहे. मराठीतील मेगा-सिनेमा म्हणूनच ओळखला जाईल अशी ह्या सिनेमाची निर्मिती होत आहे.





Comments

Popular posts from this blog

Prostitution should be Stop Immediately: Rajan Verma