मराठी सिनेमा ‘भिकारी’ साठी भव्य गणपती गाणं


गणेश आचार्य यांनी ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत आपला मराठी सिनेमा भिकारी साठी भव्य गणपती गाणं फिल्मसिटी मध्ये शूट केले.

मि मराठा फिल्म प्रोडक्शन च्या बैनर खाली गणेश आचार्या व शरद शेलार मराठी चित्रपट भिकारी ची निर्मिती सुरु केली आहे. गणेश मास्टर यांनी गणपतीची मूर्ति ४० फुट व त्याबरोबर ५०० डांसर व ५०० क्राउड सोबत गणपती गाणं  गोरेगांव स्थित फिल्मसिटी शूट केले. ह्या चित्रीकरणासाठी चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, नायिका रुचा इनामदार व करैक्टर आर्टिस्ट देखील होते. हे भव्य गाणं तीन दिवसात शूट केले गेले हा सिनेमा तमिळ चा सुपरहिट चित्रपट पिछाईकरण चा रीमेक आहे. शरद शेलार यांनी मीडिया बोलताना सांगितले १००० लोकांसाठी कपडे भाड्याने घेतले नाही तर शिवुन घेतले आहे. हे ज़बरदस्त गाणं सुखविंदर सिंग यांनी स्वरबद्ध केले आहे.

डांस मास्टर गणेश आचार्य यांनी गाण्याविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि लंबोदर तू गजानना, गजानना... हे गाण्याचे बोल असून हे गाणं जबरदस्त भव्य-दिव्य अंदाजात शूट केले आहे. हे गाणं शूट करताना जसा काही गणेशोत्सव सुरु आहे अस सर्वाना वाटत आहे. ह्या गाण्यासाठी मागील २ महीन्यापासून सर्वजण सराव करत होते व म्हणूनच इतक्या जल्लोषात हे गाणं शूट करत आहे. सर्व कलाकार व डांसर जबरदस्त परफॉर्म करत आहे. स्वप्निल जोशी व रूचा इनामदार ने फारच मेहनत घेतली आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर