'तुझं माझं अरेंज मैरिज’ या चित्रपटाचा ट्रेलर ७ मार्च रोजी मुंबईतील जुहू मधील PVR मध्ये प्रदर्शित
चित्रपटात सयाजी शिंदे, अभिजित चव्हाण, सुनील गोडबोले, अभिलाषा पाटील, बिपीन सुर्वे, प्रीतम कागणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे एक कौटुंबिक नाट्य असून या चित्रपटाची निर्मिती अमित ललित तिळवणकर आणि ज्योती अमित तिळवणकर यांनी केली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तुषार रणभोर, सचिन शाह आणि हितेश बाकलीवाल. चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश विजय शिरोदे यांनी केले असून कथा मयूर परदेशी यांची आहे. अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, जसराज जोशी आणि नागेश मोरवेकर यांनी यातील गाणी गायली आहेत. गीते मयूर परदेशी यांची असून संगीत प्रतिक प्रथमेश आणि विशाल राणे यांचे आहे. रणजीत सिंग यांनी छायालेखन केले असून नितेश नांदगावकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे. महेंद्र तिसगे आणि चमू या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून तो यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाची कथा फ्लॅशबॅकमध्ये सुरु होते आणि पाच वर्षे मागे जाते. महाविद्यालयात असताना स्वरूप हा गौरीच्या प्रेमात असतो. पण स्वरूपचे लग्न त्याचे कुटुंबीय मीरारोबर ठरवतात. दरम्यान गौरी परत येते आणि स्वरूपला त्यांच्या प्रेमाची आठवण करून देते. त्याला लग्न करण्यची भर घालते. स्वरूप आता कोणाशी लग्न करतो मिराशी की गौरीशी? या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी तुम्हाला या चित्रपटाची वाट पहावी लागणार आहे आणि तो चित्रपटगृहात जावून पाहावा लागणार आहे. या चित्रपटात प्रेमातून केलेले लग्न आणि जमवून केलेले लग्न यातील फरक अधोरेखित केला गेला आहे. मनोरंजनाबरोबरच या चित्रपटात एक महत्वाचा सामाजिक संदेशही आहे.
यावेळी बोलताना चित्रपटाचे निर्माते अमित ललित तिळवणकर म्हणाले, “तुझं माझं अरेंज मैरिज’ या चित्रपटाचा हेतू हा नवीन पिढीला एक संदेश देण्याचा आहे. जेव्हा दोन कुटुंबे लग्न जुळविण्यासाठी एकत्र येतात तेव्हा तो प्रसंग जगातील सर्वात सुखद गोष्टींपैकी एक असतो. मुलाने किंवा मुलीने त्या अख्ख्या कुटुंबाविरोधात जाणे किती बरोबर असते? तुमचे पालक किंवा कुटुंबीय तुमच्यासाठी नेहमीच योग्य असा निर्णय घेतात. ‘तुझं माझं अरेंज मैरिज’ हा असा चित्रपट आहे कि जो सर्व कुटुंबाने एकत्र बसून पाहायला हवा. प्रेक्षक आम्हाला भरभरून प्रतिसाद देतील, असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे.”
Comments