अभिजीत पवार बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' मध्ये साईबाबांचा रोल अभिजीत पवार ने साकार केला आहे व ह्या मालिकेच्या सेट वर अभिजीत पवार बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.
अभिजीत पवार ने आपल्या रोलविषयी अधिक माहिती देताना सांगितले कि मी आतापर्यंत एकांकिका, नाटके व मालिकांतून छोटे-मोटे रोल केले होते, परंतु ह्या मालिकेतुन मी प्रथमच मुख्य भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारणे खरं सांगायचे झाले तर माझ्यासाठी एक चैलेंज होते. मी साईबाबांची भूमिका साकारण्यापूर्वी बरचं काही वाचन केले होते व जी काही माहिती साईबाबांबद्दल मिळेन ती वाचत गेलो. साईबाबांची बॉडी लैंग्वेज कशी असावी, त्यांची बोलण्याची शैली, चेह-यावरील हाव-भाव, डोळ्यांची भाषा व अजून बरचं काही शिकून घेतले. जानेवारी पासून ह्या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात झाली व मागील तीन महिन्यापासून मी साईबाबांचा रोल साकारत आहे.
साईबांबाची भूमिका करताना सेट वर काही आगळा-वेगळा अनुभव आला का? ह्या प्रश्नांचे उत्तर अभिजीत एकदम तत्परेने देतो कि एकदा सेट वर एक मुलगी आपल्या आईबरोबर आली होती व तीने आईला सांगितले होते की मला साईबाबांना हाताने स्पर्श करायचा आहे. मुलीची इच्छा आईने मला सांगितली व मी होकार दिला. त्यांनतंर त्या लहान मुलीने मला खरोखरचा साईबाबा समजून हाताने मुलायम स्पर्श केला. हा क्षण फारच भावुक करणारा होता. खरोखरच त्या मुलीची इच्छा पूर्ण झाली असे मला एकदम मनापासून वाटले. त्याचबरोबर मला देखील वाटते कि आपण देखील साईबाबांची भूमिका उत्तम प्रकारे करत आहोत.
तुमची साईबाबांवर किती श्रद्धा व सबूरी आहे? ह्याबद्दल अभिजीत सांगतो कि ही सर्व साईबाबांची लीला आहे व तेच माझ्याकडून हे काम करुन घेत आहे असे मला वाटते. माझी साईबाबांवर पूर्णपणे मनापासून विश्वास आहे. साईबाबांचा रोल करताना माझ्यात देखील बदल घडवून आले आहे व मी देखील मुक्या प्राण्यांवर दया व प्रेम करु लागलो आहे.
Comments