२२ मार्चपासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर ‘सप्तपदी मी रोज चालते’
'फक्त मराठी वाहिनी’ आता दैनंदिन मालिकांच्या माध्यमातूनही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या दिशेनं मागच्या आठवड्यात सुरू झालेल्या 'साईबाबा श्रद्धा आणि सबूरी' या अनोख्या आध्यात्मिक मालिकेला काही दिवसांतच प्रेक्षकांनी आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. 'फक्त मराठी वाहिनी'ने नवनव्या कथा कल्पना असलेल्या कलाकृतींच्या निर्मितीचा ध्यास घेतला असून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीनुसार विविध कार्यक्रमांच्या निर्मितीला सुरुवात करीत 'सप्तपदी मी रोज चालते’ असं शीर्षक असलेली दुसरी दैनंदिन नवी कोरी मालिका येत्या सोमवार, २२ मार्चपासून रात्रौ ८ :३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्या 'फक्त मराठी वाहिनी'वर आणली आहे.
Comments