"फक्त मराठी वाहिनी"चे बिझनेस हेड श्याम मळेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली
साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी"ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती आहे व १५ मार्च सोमवार पासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका सुरु झाली आहे. हयाच मालिकेच्या सेट वर मुंबईतील सिनेपत्रकारांना "फक्त मराठी वाहिनी" ने आमंत्रित केले होते.
"फक्त मराठी वाहिनी" चे बिझनेस हेड श्याम मळेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.
श्याम मळेकर यांनी 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' ह्या नवीन मालिकेबद्दल बोलताना सांगितले कि श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्रीसाईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे. १५ मार्च सोमवार पासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका सुरु झाली आहे.
त्याच बरोबर "फक्त मराठी वाहिनी" बद्दल अधिक माहिती देताना श्याम मळेकर म्हणाले कि ह्या चैनलला सुरु होऊन ४-५ वर्ष झाले आहेत व दर्शकांना आपलेसे करून टाकले आहेत. आता ह्या चैनल वर प्रत्येक आठवड्याला नवीन सीरियल प्रदर्शित होणार आहे व दर्शकांना मनोरजंनाचा नवा खजिना पहावयास मिळणार आहे, जेणेकरून एकत्र कुंटुंब पद्धतीत घरांतील सर्वांचे मनोरंजन होईल. फक्त मराठी हा चैनल आता टॉप ५च्या क्रमांकावर आला आहे व दिवसे-न-दिवस प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत पुढे चालला आले. ह्या चैनल द्वारे दर्शकांना दर्जेदार मनोरंजनाचा खजानाच मिळेल.
साईबाबा वर मालिका बनविण्याचे मुख्य कारण काय आहे? ह्या प्रश्नांचे उत्तर देताना श्याम मळेकर म्हणाले कि आतापर्यंत साईबाबा यांच्या जीवनावर नाटक, सिनेमे व मालिका बनल्या आलेत व महाराष्ट्रातील प्रत्येक घरात साईबाबा पोहचले आहेत. सध्या जगभर कोरोनाचे सावट पसरले आहे व दर्शकांना एक चांगली व उत्तम मालिका देण्याच्या एकमेव उद्देशानेच साईबाबा ही सीरियल बनविली आहे व ही मालिका बनविण्यासाठी भरपूर संशोधन केले आहे. ह्या मालिकेचे माध्यमातून १८७२ पासूनचा काळ उभा करण्याचा प्रयत्न केला आहे व हयासाठी भरपूर रिसर्च वर्क केले आहे व साईबाबांचा जीवन प्रवास दाखविण्याचा आगळा-वेगळा प्रयत्न केला आहे, जो मराठमोळ्या दर्शकांना नक्कीच आवडेल अशी आशा आहे.
Comments