दिग्दर्शक प्रसाद श्रीकांत ठोसर

मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' चे दिग्दर्शक – प्रसाद श्रीकांत ठोसर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.



दिग्दर्शक प्रसाद श्रीकांत ठोसर यांनी साईबाबा मालिके बद्दल माहिती देताना सांगितले कि ह्या मालिकेचे दिग्दर्शन करणे ही देखील एक साईलीलाच आहे. साईबाबांबद्दल ह्या मालिकेच प्रत्येक गोष्ट ही रिसर्च करुनच मांडण्यात आली आहे. प्रत्येक गोष्टीला एक लॉजिक आहे व ती गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिर्डीत रामनवमी उरुस असो वा लहान मुले साईबाबांना वेडा फकीर म्हणून दगड मारीत असे अथवा इतर लोक त्रास देत असे. हे सर्व काही संशोधन करुनच दाखविण्याचा एक आगळा-वेगळा प्रयत्न ह्या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आला आहे, जो दर्शकांना नक्कीच आवडेल. साईबाबांची श्रद्धा व सबूरी हीच ह्या मालिकेची खासियत आहे. साईबाबांची ख्याती भारतात व भारताबाहेर सुद्धा आहे आणि त्यांच्यावर श्रद्धा असणा-यांनी अनुभूती आलेल्यांनी त्यांच्यावर बरेच लिखाण वेगवेगळ्या भाषांमध्ये करुन ठेवले आहे... त्याला एका काल्पनिक धाग्यात गुंफून १८७२ पासूनचा कालावधी मालिकेत उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर