साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी" वर मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी'
शंकर मराठे - मुंबई, १५ मार्च २०२१: श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री साईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे. साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी"ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती आहे. १५ मार्च सोमवार पासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका सुरु झाली आहे.
Comments