निर्माता-कला दिग्दर्शक – अजित दांडेकर
मराठी मालिका 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' चे निर्माता-कला दिग्दर्शक – अजित दांडेकर बरोबर बॉलीवुड मार्केटचे संपादक शंकर मराठे ने चर्चा केली.
अजित दांडेकर यांनी 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' ह्या मालिकेची निर्मिती कशी काय केली ह्याबद्दल बोलताना सांगितले कि सध्या कोरोनाचे सावट सर्व जगभर पसरले आहे व काहीतरी वेगळे करण्याच्या एकमेव उद्देशाने ही मालिका बनविली आहे. तसेच ही मालिका बनविण्याच्या पहिले भरपूर रिसर्च केले गेले व खासकरून शिर्डी येथे जाऊन तेथील जुन्या लोकांशी संवाद साधला व साईबाबा विषयी जी काही माहिती मिळाली, ती जमविली. एवढचं काय तर अनेक ग्रंथ, कांदब-या वाचल्या व साईबाबांच्या जीवनाविषयी माहिती जमा केली. ह्या मालिकेच्या निर्मितीसाठी भरपूर काही संशोधन केले, जेणेकरून मराठ-मोळ्या दर्शकांना ह्या मालिकेच्या माध्यमातून साईबाबांचे नवीन आचार-विचार पहावयास मिळेल. ह्या सीरियल द्वारे साईवचन प्रत्येक भागात पहावयास मिळणार आहे व ही मालिका साईबाबांच्या तरूण वयापासून सुरु होत आहे, जेव्हा ते शिर्डीत येतात. ह्या मालिकेत साईलीला बघावयास मिळणार आहे तसेच साईचे जे काही चत्मकार असेल त्याला विज्ञानाचा टच देण्याचा प्रयत्न केला आहे. एवढचं काय तर साईबाबा लोकांना बरे करण्यासाठी औषध पण देत असे व त्यांना जेव्हा हे जमणे अशक्य झाले तेव्हा त्यांनी उदी देण्यास सुरुवात केली. अशा अनेक गोष्टी ह्या मालिकेच्या माध्यमातून दर्शकांना बघावयास मिळणार आहे.
Comments