SSR death case : ड्रग्ज पार्टीमध्ये रिया देखील सहभागी असायची

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय, ईडीमार्फत सुरु आहे. या तपासात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सुशांतच्या घरी नेहमीच पार्ट्या व्हायच्या. या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे सेवन केले जायचे. या पार्टीमध्ये रिया चक्रवर्ती देखील सहभागी असायची, असा गौप्यस्फोट सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी हिचे वकील अशोक सरोगी यांनी केला आहे.

मुंबई पोलिसांनी आधीच तपास केला असता तर सुशांतच्या घरात ड्रग्जचे पुरावे सापडले असते, असेही ते म्हणाले. श्रुतीची नेमणूक सुशांतनेच केली होती. रियाशी तिचा काहीच संबंध नाही. अपघात झाल्याने श्रुतीला हा जॉब सोडावा लागला, अशी माहितीही सरोगी यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog

शेखर सुमन का नया शो 'सक्सेस स्टोरीज – जमीन से फलक तक – सीजन १' ज़ी बिज़नेस पर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे