सुशांतप्रकरणी रियाला अटक होण्याची दाट शक्यता
|अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अंमली पदार्थांचा संबंध आढळल्यानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो सुशांतप्रकरणी अतिशय वेगानं तपास करत आहे. सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांच्या मोबाईलमध्ये एनसीबीला अंमली पदार्थांच्या व्यापाराविषयी मेसेज आढळले होते. यामुळे शुक्रवारी सकाळी एनसीबीने रियाच्या घरी छापा टाकत शौविकला ताब्यात घेतलं आहे. तसेच चक्रवर्ती कुटुंबाचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडालाही एनसीबीनं ताब्यात घेतलं आहे.
शौविकनं चौकशीदरम्यान बहिण रियाविरुद्ध कबुली जबाब दिला आहे. तसेच रियाविरुद्ध आणखीही काही ठोस पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. यामुळे सुशांतप्रकरणी रियाला अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी दिली आहे.
रिया चक्रवर्ती अटकेसाठी तयार आहे कारण ही संशयितांची धरपकड आहे. जर कोणावर प्रेम करणं गुन्हा असेल तर रियाला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. रिया निर्दोष असल्यानं तिनं बिहार पोलीस, सीबीआय, ईडी आणि एनसीबीनं दाखल केलेल्या गु.न्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही, अशी माहिती माने शिंदे यांनी दिली आहे.

Comments