प्रतीक्षा मुणगेकर शोधतेय भुताचा...
मराठी प्रेक्षकांसाठी ‘जेमप्लेक्स’ प्रस्तुत करीत आहे ‘भुताचा नवीन पत्ता’ शोधात असलेल्या नायिकेची कथा व व्यथा मांडणारा शो ‘कोर्टयार्ड ७०४’. याचे लेखन व दिग्दर्शन केले आहे किरण नारायण कांबळी यांनी व निर्मिती केली आहे प्रकाश तिवारी, रोहन तिवारी, सुरेश अंचन, विशालकुमार पाटील, अविषेक मजुमदार, रवींद्र महादेव शेट्ये आणि निखिल विठ्ठल चव्हाण यांनी.
‘कोर्टयार्ड ७०४’ चे कथानक हे स्त्रीप्रधान असून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे प्रतीक्षा मुणगेकर. प्रतीक्षा प्रेक्षकांना माहीतच आहे कारण ‘घाडगे अँड सून’ मध्ये ती कियारा च्या भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांना तिने ‘तू तिथे मी’, पुढचं पाऊल’, ‘छत्रीवाली’, ‘अग्निहोत्र २’, क्राईम पेट्रोल - दस्तक’ (हिंदी) सारख्या मालिकांमधून रिझविले आहे. तिने ‘खैरलांजीच्या माथ्यावर’, ‘बाष्ठ’, ‘विडा, एक संघर्ष’ ‘बाबो’ सारख्या चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका रेखाटल्या. अशी ही प्रतिभासंपन्न अभिनेत्री, प्रतीक्षा मुणगेकर, मराठी वेब सिरीजमध्ये पदार्पण करतेय ‘कोर्टयार्ड ७०४’ मधून.
रेवती आपला पती गौतम भागवत सोबत एका सुंदर अपार्टमेंटमध्ये राहावयास येते. परंतु काही दिवसांतच तिला विचित्र आणि अप्रिय गोष्टींचा प्रत्यय येऊ लागतो. शेजारील वृद्ध जोडपे, रमाकांत आणि मिनाक्षी अधिकारी, अचानक विक्षिप्तपणे वागू लागतात व पोटुशी असलेल्या तिला मीनाक्षीने दिलेले कंठस्नान रुचत नाही. तिच्या मनात प्रसूतीनंतर तिला स्वतःच्या गर्भधारणेबद्दलचे एक कटू सत्य समजते. ते काय किंवा पुढे काय-काय घडते याबाद्दल ‘कोर्टयार्ड ७०४’ पाहणेगरजेचे आहे.
‘जेमप्लेक्स‘ ची ओरिजिनल मराठी वेब सिरीज ‘कोर्टयार्ड ७०४’, प्रकाशित झाली आहे.
Comments