बिग बी व अभिषेक कोरोना पॉझिटिव्ह तर रेखाचा बंगला कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित
बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता अभिनेता अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. या संदर्भात अभिषेक बच्चनने ट्वीट करून माहिती दिली आहे. तसेच अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन, आई जया बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चना यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे. शनिवारी रात्री महानायक अमिताभ बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. महानायक बिग बी यांनी स्वतः ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली होती. यांनतर आता अभिषेकलाही कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे.
अभिषेक बच्चनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “माझ्या आणि माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमच्या दोघांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षण आहेत.सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” अशी माहिती दिली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही संपर्कात असून त्यांना सहकार्य करत आहे, असेही अभिषेक बच्चनने म्हटले आहे.
रेखाचा बंगला सील - अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या सुरक्षा रक्षकाला कोरोना संसर्ग झाल्याने महापालिका प्रशासनाकडून बंगला सील करण्यात आल्याची माहिती सुत्राकडून मिळते आहे. मुंबई स्थित बांद्रा येथील स्प्रिंग बंगल्याबाहेर २ सुरक्षा रक्षक तैनात असतात, त्यातील एका सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने पालिका प्रशासनाने बंगला कंटेनमेंट क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.

Comments