जश्न अग्निहोत्री पहिला पंजाबी चित्रपट ‘चन तारा’ मध्ये डबल रोल मध्ये दिसणार.


जश्न अग्निहोत्री सध्या फारच चर्चेत आहे, कारण तीने पंजाबी सिनेमात एक नाही, तर चक्क डबल रोल साकार केला आहे. जशन ने आतापर्यंत १०० हून अधिक जाहिरातीमधून काम केले आहे, सुप्रसिद्ध म्यूजिक वीडियो मध्ये काम केले आहे, रियलिटी शो ड्रामेबाज़ नंबर १ शो देखील होस्ट केला आणि दोन हिंदी सिनेमे - मधुर भंडारकरचा इंदु सरकार व अनिल शर्मा यांचा जीनियस.

जश्न ने मीडियाला सांगितले कि पंजाबी चित्रपट चन तारा एक कमर्शियल सिनेमा आहे, ज्यात कॉमेडी, रोमांस आणि ड्रामा आहे. मी ह्या रोल साठी फारच मेहनत घेतली आहे. हा रोल उत्तम प्रकारे साकार करण्यासाठी मी हेमा मालिनीचा सिनेमा सीता और गीता व श्रीदेवीचा चित्रपट चालबाज़ कित्येक वेळा पाहिला आहे. ह्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत विनीत अटवाल व निर्माता आहे सतनाम तातला. चन तारा मध्ये पंजाबी आणि बॉलीवुड मधील मिळतीजुळती कास्ट आहे आणि मला आशा आहे कि हा सिनेमा दर्शकांना फारच पसंत पडेल.

जश्न सध्या फारच आनंदी आहे, कारण एक तर पंजाबी चित्रपट चन तारा ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे, तर पुढच्या वर्षी दोन सिनेमे येणार आहे - एक हिंदी व एक पंजाबी. जेव्हा आम्ही विचारले कि तुम्ही फक्त बॉलीवुड मध्ये काम करणार आहे, तेव्हा तीने सांगितले कि मी एक कलाकार आहे, मला चांगले रोल करायचे आहेत, त्यासाठी हिंदी सोबत इतर भाषेतील सिनेमे देखील चालतील. मला फक्त चांगले काम करायचे आहे.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर