मुंबई - अभ्यास हा महत्त्वाचाच. पण अभ्यासासोबत इतर कलागुणांना वाव मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पुढे जाऊन करिअर उत्तम बनवण्यासाठी जसा शिक्षणाला पर्याय नाही तसंच जर व्यक्तिमत्त्व विकसित करायचं असेल तर स्वत:तल्या कलागुणांना योग्य वेळी आकार देणंही तितकंच गरजेचं आहे आणि याच विचारातून पिंगेज ट्यूशन क्लासेसने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एका खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं. क्लासिकल, फोक, बॉलीवूड, साल्सा, हिपहॉप असे अनेक नृत्यप्रकार, गायन, वादनाची जुगलबंदी, नाटुकली, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांनी पिंगेजच्या फण्टूशची संध्याकाळ रंगली होती. विशेष म्हणजे या सोहळ्याचं दिग्दर्शन, लेखन, अँकरिंग, नृत्य आणि नाट्यदिग्दर्शन, कार्यक्रमाची प्रकाशयोजना, संयोजन अशा सगळ्या जबाबदार्या विद्यार्थ्यांनी उचलल्या होत्या आणि नेहमी गणित, इको, भाषा इत्यादी विषय शिकवणारे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांसोबत यात कंबर कसून उतरले होते. सहभागी झालेले विद्यार्थी अभ्यासाच्या वेळा सांभाळून महिनाभर प्रॅक्टीस करत होते आणि या खासमखास फण्टूश संध्याकाळी आपल्या मित्रांच्या कलाकारीला चीअरअप करण्यासाठी, हा कलामहोत्सव एन्जॉय करण्यासाठ...