फनचा 'फण्टूश' फंडा
मुंबई - अभ्यास हा महत्त्वाचाच. पण अभ्यासासोबत इतर कलागुणांना वाव मिळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. पुढे जाऊन करिअर उत्तम बनवण्यासाठी जसा शिक्षणाला पर्याय नाही तसंच जर व्यक्तिमत्त्व विकसित करायचं असेल तर स्वत:तल्या कलागुणांना योग्य वेळी आकार देणंही तितकंच गरजेचं आहे आणि याच विचारातून पिंगेज ट्यूशन क्लासेसने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एका खास सोहळ्याचं आयोजन केलं होतं.
क्लासिकल, फोक, बॉलीवूड, साल्सा, हिपहॉप असे अनेक नृत्यप्रकार, गायन, वादनाची जुगलबंदी, नाटुकली, फॅशन शो अशा विविध कार्यक्रमांनी पिंगेजच्या फण्टूशची संध्याकाळ रंगली होती. विशेष म्हणजे या सोहळ्याचं दिग्दर्शन, लेखन, अँकरिंग, नृत्य आणि नाट्यदिग्दर्शन, कार्यक्रमाची प्रकाशयोजना, संयोजन अशा सगळ्या जबाबदार्या विद्यार्थ्यांनी उचलल्या होत्या आणि नेहमी गणित, इको, भाषा इत्यादी विषय शिकवणारे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांसोबत यात कंबर कसून उतरले होते. सहभागी झालेले विद्यार्थी अभ्यासाच्या वेळा सांभाळून महिनाभर प्रॅक्टीस करत होते आणि या खासमखास फण्टूश संध्याकाळी आपल्या मित्रांच्या कलाकारीला चीअरअप करण्यासाठी, हा कलामहोत्सव एन्जॉय करण्यासाठी पिंगेजचा समस्त विद्यार्थी परिवार सहभागी झाला होता.
विद्यार्थ्यांनीच बसवलेली 'सलीम अनारकली', 'कौन बनेगा करोडपती', 'रजनीकांत रिटर्नस्', 'बाबा' अशा विनोदी नाटुकल्यांनी प्रेक्षक खूश झाले. तर फॅशन शोच्या निमित्ताने बॉलीवूडची शंभर वर्षे स्टेजवर अवतरली होती. अशोक कुमारपासून ते रणबीर कपूरपर्यंत बॉलीवूडचा बदलता काळ प्रेक्षकांनी मनापासून एन्जॉय केला.
या सोहळ्याला चारचांद लागले खास सेलिब्रेटींच्या आगमनाने. तरुणाईची धडकन असणारा अभिजीत खांडकेकर आणि आपल्या नृत्यांनी अख्ख्या मराठी इंडस्ट्रीला भुरळ पाडणारी फुलवा खामकर यांनी सभागृहात प्रवेश केला आणि शिट्या टाळ्यांच्या घोषात प्रेक्षकांनी अक्षरश: सभागृह डोक्यावर घेतलं. फुलवाचं 'अप्सरा आली' या गाण्यावर स्वागत करण्यात आलं तर अभिजीत आल्यावर 'माझिया प्रियाला प्रीत कळेना'च्या धूनवर त्याला स्टेजवर घेऊन गेले.
हा कार्यक्रम पाहून आम्हाला कॉलेजच्या युथफूल दिवसांची आठवण झाली. तरुणाईचा इतका सळसळता उत्साह आणि कलागुण पाहून अक्षरश: अचंबित व्हायला झाल्याचंही या दोन्ही सेलिबेट्रींनी सांगितलं.
विद्यार्थ्यांचा अभ्यास उत्तम व्हावा आणि शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील असतोच पण अभ्यासासोबत त्यांच्यातील कलागुणांना महत्त्व देणंही गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही फण्टूशचं आयोजन केलं, अशी माहिती पिंगेजचे व्यवस्थापक अजय पिंगे यांनी दिली. आम्ही गेल्या वर्षीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवा पायंडा पाडला. कॉलेजमध्ये युथ फेस्टिव्हल दरवर्षी होतातच. पण खासगी शिक्षण संस्थेत मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात युथ फेस्टिव्हल फण्टूशच्या निमित्ताने पहिल्यांदाच सुरू झालाय. मुलांमध्ये असणारी आवड लक्षात आल्यानेच त्यांना हे व्यासपीठ द्यायचं आम्ही ठरवलं. या सांस्कृतिक कार्यक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी फण्टूश फनफेअरचं आयोजनही करण्यात येतं आणि अभिनय, नृत्य, गायन यासोबत हस्तकला, पाककौशल्य या गोष्टींनाही एक वेगळं व्यासपीठ द्यायचा हा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.

Comments