ई टीव्ही मराठीवरील 'जल्लोष सुवर्णयुगाचा'
मुंबई - नृत्य म्हणजे तालावर लयबद्ध थिरकणे आणि संगीताला समजून घेऊन त्यावर नृत्य सादर करणे. पण या नृत्याला स्टंटची जोड दिली, तर रसिकांना एक मेजवानीच मिळते. अशीच एक मेजवानी ई टीव्ही मराठीवरील 'जल्लोष सुवर्णयुगाचा' या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
या आठवड्यात स्पर्धकांच्या साहस आणि धाडसाची कसोटी लागणार आहे. या आठवड्यामध्ये स्पर्धकांना नृत्य सादर करताना आग, रिंग्जस, हारनेस अशांचा वापर करून आपले नृत्यकौशल्य दाखवायचे आहे. केतकी पालव हिला वर्टीगोचा त्रास आहे. यामुळे तिच्या मनात एक प्रकारची भीती होती. पण या आठवड्यातील स्टंट राऊंडमुळे केतकीने आपल्या भीतीवर मात केली आहे. केतकी स्टंट राऊंडमध्ये एरिअल डान्स सादर करणार आहे.
'मला उंचावर गेल्यावर खूप भीती वाटते, खूप घाबरते. पण निव्वळ जल्लोषमुळे मी माझ्या भीतीवर मात करू शकले. मी पहिल्यांदाच इतक्या उंचीवर गेले' असे केतकी पालव हिने सांगितले.

Comments