फिल्मी न्यूज - 29/12/12


ऋतिक हा देखणा सुपरहिरो: शाहरूख
शाहरूख खानच्या मते ऋतिक रोशन हा सर्वात देखणा व चिकना सुपरहिरो आहे. शाहरूख खानच्या मते ऋतिक रोशन हा बॅटमन, सुपरमन आणि स्पायडरमन यांच्यापेक्षाही आकर्षक व देखणा सुपरहिरो आहे. शाहरूखच्या मुलांचा ऋतिक हा आवडता स्टार असून ते शाहरूखपेक्षा ऋतिकचेच चित्रपट बघणे जास्त पसंत करतात.


डर्टी गर्ल विद्या बालन म्हणेत बोल्ड सीन नको
'डर्टी पिक्चर' या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविलेल्या विद्या बालन आणि करिना कपूर या आघाडीचया बॉलिवूड नायिकांनी लग्नानंतर बोल्ड सीन करण्यास नकार दिला आहे. पान सिंह तोमर या चित्रपटाचे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी त्यांच्या आगामी 'बेगम समरू' या चित्रपटात काम करण्यासाठी या दोन्ही नायिकांना विचारणा केली होती, मात्र चित्रपटाच्या बोल्ड आशयामुळे लग्न झालेल्या या दोन्ही नायिकांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. बेगम समरू हा चित्रपट 18व्या शतकातील नृत्यांगणेच्या जीवनावर आधारिक असणार आहे. एका हिंदी कादंबरीवरून या चित्रपटाचे कथानक घेण्यात आले आहे.


सलमान खान की बायको कोण...
सलमान खान भले लग्न नाही करणार आहे, पण त्याच्या लग्नाला घेऊन त्याचे चाहते नेहमी चर्चा करीत असतात. बर्‍याच सुंद-या दबंग खानच्या जीवनात आल्या व गेल्या, पण खानने कुणालाच आतापर्यंत आपले जीवनसाथी बनवले नाही. नुकत्याच एका कंपनीने सर्वेक्षण करून लोकांकडून त्याचे मत मागितले ती त्यांच्या नजरेत सलमानची आदर्श पत्नी कोण बनू शकते, तेव्हा 70 टक्के लोकांनी कॅटरिना कैफच्या नावावर आपली मोहर लावली. एक महत्त्वाची गोष्ट या सर्वेक्षणात समोर आली आहे की 60 टक्के पुरुषांचे मत होते की सलमान खान ने कधीच लग्न करू नये, त्याचे कारण म्हणजे या लोकांचे लग्नाच्या बाबतीत वाईट अनुभव असतील. दुसरीकडे 62 टक्के महिलांचे मत आहे की सलमानने आता लवकरात लवकर लग्न करून घ्यायला पाहिजे.

कंगना राणावतचे नाते जुडले
अध्ययन सुमनशी असलेले अफेअर तुटल्यानंतर एकाकी पडलेल्या कंगना राणावतचे सूर आता दिग्दर्शक कुणाल देशमुखशी जुळले आहेत. गेल्या काही दिवसांत या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. कंगनाने कुणालला गिफ्ट दिल्याचीही चर्चा आहे. कुणाल आणि कंगना एकमेकांना बर्‍याच आधीपासून ओळखत आहेत. दोघेही भट्ट कॅम्पशी निगडीत आहेत. परस्परांच्या संबंधांबाबत बोलण्यास मात्र दोघेही उत्सुक नाहीत. आपल्या दोघांत शुद्ध मैत्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.



Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर