स्नीकर्स मध्ये रेखा सोबत उर्मिला देखील दिसणार
मुंबई - 1960 सालापासून 80 च्या दशकापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी भूमिकांनी प्रेक्षकांना भुरळ घालणारी ग्लैमरस रेखा आता फारच कमी चित्रपटांतून दिसत आहे. उतारवयात आलेली रेखा अनेक बाबींनी नवोदित तारकांपेक्षा वरचढ आहे. अभिनयापासून सौंदर्यातही रेखाची जादू जरा देखील कमी झाली नाही. अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणार्या रेखाला आजही अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. परंतु निवडक चित्रपटांमध्येच काम करण्याचा निर्णय घेतल्याने तिने अनेकांना नकार दिला. राज्यसभेचे सदस्य मिळाल्यापासून तर रेखाचा भाव अधिकच वधारला होता. खासदारकीमुळे अनेक बंधने आल्याने तिने पार्टी आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळले आहे. मात्र आतापर्यंत छोटय़ा पडद्याला टाळणार्या रेखाला अखेर जाहिरातीत काम करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 'स्नीकर्स' या चॉकलेटच्या जाहिरातीत रेखा दिसणार आहे. तिच्याबरोबर उर्मिला मातोंडकरदेखील असणार आहे.
Comments