पिपाणी सिनेमात शेतक-याची व्यथा
सध्या महागाईच्या सतत धगधगणार्या वणव्यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. वाढती महागाई ही देशापुढील ज्वलंत आणि गंभीर समस्या असताना ती रोखण्यात सरकार सातत्याने अपयशी ठरल्याची राजकीय वर्तुर्ळातून सातत्याने व्यक्त होत आहे. बाजारात शेतमालाचे भाव वाढत असले तरी त्याचा फायदा मधल्या दलालांनाच.शेतकऱ्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च भरमसाट वाढलेला आहे.बी-बियाणे,खते, कीटकनाशकांचे भाव,शेतकामगारांचे वेतन,मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. शेतीउत्पादनाला बाजारात मिळणारा भाव हा उत्पादन खर्चाची तोंडमिळवणी करण्यासही असमर्थ ठरला आहे. शेती हा तोट्यााचा व्यवसाय झाला आहे. शेतकरी हा सदैव कर्जात बुडालेला आहे.त्याचे जगणे कठीण झाले आहे.त्यामुळेच मृत्युला कवटाळण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय उरलेला नाही. तनिष्क डिजीटल आय प्रस्तुत,बाबुराव भोर निर्मित पिपाणी या सिनेमातून शेतकऱ्यांची ही व्यथा अधोरेखित करतानाच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केलेल्या सरकारी योजनांचे मधल्यामध्ये नेमके काय होते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. .
प्रत्येक शेतमालाला उत्पादक खर्चाधारित किमान बाजारभाव निर्धारित करण्याकरिता सरकारने प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. निर्धारित भाव शेतक-यांच्या खिशात जाणारी सक्षम यंत्रणा तयार करावी. आणि शेतक-यांच्या हिताकरिता उक्तीपेक्षा कृतीला प्राधान्य देण्याची आज गरज असल्याची भूमिका हा चित्रपट मांडतो.
निर्माते बाबुराव भोर हे शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे,त्याच त्यांनी पिपाणी सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पि(क)पाणी चे दिग्दर्शक आहेत गजेंद्र अहिरे त्यांनी आजवर चित्रपटातून समस्या प्रधान गोष्टी सातत्याने हाताळल्या आहेत.इथेही त्याने सद्य स्थितीचा, त्यांच्या समस्यांचा विषय हाताळला आहे पण प्रेक्षकांना तो अधिक प्रखरतेने भिडवा ह्यासाठी त्याची मांडणी ब्लॅक कॉमेडी पद्धतीची आहे.
हॉलीवुड चित्रपट क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणीला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने चित्रपट निर्मिती तिला करायची आहे.तिच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी ञानेश्वर टेंबरे ह्यांची नियुक्ती केली जाते. गावातल्या सगळ्या गोष्टींशी परिचय असलेला ,प्रत्येक घराघराशी संपर्क असलेल्या आणि मिस्टर ग्रामीण हे विशेषण सार्थ ठरवणारया अश्या पोपटरावच्या मदतीने जो मकरंद अनासपुरेने साकारला आहे तो या चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होतो.मकरंद अनासपुरेने अफलातून अशी ही व्यक्तीरेखा रंगवली आहे.
एक गंभीर समस्या मांडताना ती कुठेही बोजड होणार नाही हे या चित्रपटाच्या ब्लॅक कॉमेडीच्या शैलीमुळे शक्य झाले आहे आणि अगदी छोट्या भूमिकांसाठीही मोठ्या ताकदीच्या कलाकारांची फळी दिग्दर्शकाने वापरली आहे. शेतकरी कुटुंबातल्या निर्मात्याने शेतकऱ्यांच्या समस्या चित्रपट रुपाने मांडण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
Comments