'यमराज हार गया' - बाळासाहेब ठाकरे
अभिनेता अमिताभ बच्चन यांनी काल रात्री बाळासाहेबांची भेट घेतली आणि घरी गेल्यावर बाळासाहेबांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करताना जुन्या आठवणींना उजाळा देत काही ट्विट्स केले. बाळासाहेब ठाकरे हे लढवय्ये आहेत, असं ते म्हणाले. मला 'कुली' चित्रपटाच्या वेळा अपघात झाला होता तेव्हा माझ्यासाठी ते एक व्यंगचित्र घेऊन आले होते. त्यावर लिहिलं होतं, 'यमराज हार गया'. मी सुध्दा व्यंगचित्रकार असतो तर, मीसुध्दा त्यांच्यासाठी व्यंगचित्र काढून घेऊन गेलो असतो आणि त्यावर लिहिलं असतं 'यमराज हार गया'. जेव्हा जया घरी लग्न करून आली तेव्हा त्यांनी आम्हाला घरी बोलवून घेतलं होतं आणि तीचं एखाद्या सुनेसारखं स्वागत केलं होतं. त्यानंतर आम्ही त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो होतो. तसेच बोफोर्स घोटाळ्यात माझं नाव आलं, तेव्हा त्यांनी मला घरी बोलवून घेतलं आणि विचारलं हे सर्व खरं आहे का? जर खरं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही.
Comments