८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० - ठाणे
८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे दि. २५, २६, २७ डिसेंबर २०१० दरम्यान संपन्न होत आहे. या संमेलनाचे भरगच्च कार्यक्रम जाहिर झाले आहेत. संमेलनपूर्व उपक्रम जोरात सुरु आहेत. दरवर्षी होणार्या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत.... आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला? प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान इंटरनेटद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता संमेलनाच्या आयोजकांनी उपलब्ध केली आहे. याचबरोबर आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनातील या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही... साहित्य संमेलनांच्या इतिहासात अशा प्रकारे साहित्य रसिकांना परिसंवादांत सहभागी करुन घेण्याची सोय मराठीसृष्टी या लोकप्रिय वेबपोर्टलच्या सहयोगाने प्रथमच उपलब्ध झाली आहे. या साहित्य संमेलनात खालील विषयांवर परिसंवाद आयोजित केलेले आहेत. आपण कोणत्याही परिसंवादावर मोकळेपणाने आपली मते मांडू शकत...