सूर्यतेज प्रोडक्शन चा संहिता
नीता देवकर, अमृता राव आणि माधुरी आशिरगडे या तीन निर्मात्या एकत्र येऊन 'सुर्यतेज प्रॉडक्शन' या बॅनरखाली 'संहिता' या चित्रपटाची निर्मिती करित आहेत. सुमित्रा भावे या चित्रपटाचे दिग्दर्शन करित असून स्त्रीची विविध रुपे, तिच्या आयुष्यातील सुख-दु:ख, भावभावना मांडणारी कथा-पटकथा व संवादही त्यांचेच आहेत. सुनंदा कळुसकर आणि वंदना वाकनीस या कार्यकारी निर्मात्या आहेत. कला दिग्दर्शन, संगीत, संकलन, वितरण, प्रसिद्धी आदी जबाबदार्या महिलाच सांभाळणार असून पुरुष फक्त कलाकार म्हणून असतील.
Comments