ज्योतिबाच्या नावानं चांगभल...

मुंबई ते कोल्हापूर ट्रेन नी ८-९ तासांचा प्रवास केल्यावर कोल्हापूर येथे पोहचल्यावर महालक्ष्मी चे दर्शन घेतल्यानंतर तेथून १८ किलो मीटर अंतरावर श्री ज्योतिबाचं मंदिर आहे.
श्री केदारनाथ मंदीर हे क्वचितच आढळणारे दक्षिणाभिमुख असे मंदीर आहे.मंदिर हेमाडपंथी या प्रकारातील असून त्याचा कालखंड करवीरवर राज्य करणाऱ्या ७ व्या शतकातील भोज शीलाहावंशीय समकालीन असून ११ व्या शतकापासून आज पावेतो त्याचा तीन वेळा जीर्णोध्दार झालेला आहे.
सध्याच्या मंदिराचा जीर्णोध्दार ग्वाल्हेरच्या शिद्दांचे मूळ वंशज यांनी इ.स.१७३० साली केला.याशिवाय कादारेश्वराचे मंदीरा जे खांबाशिवाय उभे आहे ते आणि नंदिचे मंदीर ग्वाल्हेर घराण्यातील दौलतराव शिंदे यांनी १८०८ मध्ये बांधले.केदारनाथ आणि केदारेश्वर मंदीराच्या मध्ये असणारे चर्पट अंबा म्हणजे चोपडाई देवालय प्रितीराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी इ.स.१७५० मध्ये बांधले. हा सर्व तीन मंदीराचा एक समूह आहे.
या मंदीराशिवाय रामेश्वर मंदीर इ.स.१७८० मध्ये मालजी निकम पन्हाळकर यांनी बांधले. तसेच चाफेबनात असणारे गावापासुन उत्तरेस पर्लांगभर अंतरावरील यमाई मंदीर सुध्दा राणोजी शिंदे यांनी इ.स.१७३० मध्ये बांधले.

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

आते ही छा गया यश कुमार की फिल्म का ट्रेलर