'ब्रह्मांडनायक' गण गण गणात बोते

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या भक्तिचा महिमा अगाध आहे. सर्वदूर पसरलेल्या लाखो भक्तांचे शेगांवचे गजानन महाराज हे श्रद्धास्थान आहे. धावपळीच्या आयुष्यात मानसिक शांतिसाठी भक्तीमार्ग हाच एकमेव उपाय ठरत आहे हे जाणून 'ब्रह्मांडनायक' ही गजानन महाराजांच्या जीवनावर आधारीत नवीन मालिका 'मी मराठी' वाहिनीवर दाखल झाली आहे. दर
'गण गण गणात बोते'ची शिकवण देणार्या गजानन महाराजांनी शेगावमध्ये अनेक चमत्कार केले. अनेक समाजपयोगी कामे करणार्या गजानन महाराजांना भेटायला ब्रह्मगिरी महाराज येतात व ते श्री ना वेद पुराणातले काही कळत नाही हा तर भोंदू बाबा आहे असा आरोप करतात. पण महाराज त्यांना पेटत्या पलंगावर स्वतःबरोबर बसायची विनंती करतात. ब्रह्मगिरी महाराज तिथून कसा पळ काढतात ही कथा दाखविण्यात आली आहे.
याशिवाय पुढील भागात आपण पाहणार आहोत माळी विठोबा नावाच्या महाराजांच्या लबाड भक्ताची गोष्ट. भाविकांकडून पैसे लुबाडणारा विठोबा प्रसाद, मिठाई, फळे इ. महाराजांकडे पोहचण्याच्या आधीच स्वतः लंपास करतो. मग महाराज त्याला कशा प्रकारे चोप देतात ते पहायला मिळणार आहे. तेव्हा आवर्जुन पहा मी मराठीवर सोम ते मंगळ रात्री ९.०० वा. शेगांवच्या गजानन महाराजांवर आधारित 'ब्रह्मांडनायक' ही मालिका.
त्याच बरोबर मालिके मध्ये एक प्रश्न देखील विचारला जातो व ह्या प्रश्नांचे उत्तर योग्य दिल्यावर
श्री स्वामी समर्थाची शाल देखील बक्षिस म्हणून देण्यात येते.
Comments