नवरा अवली बायको लवली लवकरच झळकणार
गेली ३६ वर्षे मराठी चित्रपटसृष्टीचा अनुभव असलेले संकलक-दिग्दर्शक संजीव नाईक ह्यांनी सराव प्रोडक्शनच्या बैनरखाली नवरा अवली बायको लवली या धमाल विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हया चित्रपटाची स्टोरी पती, पत्नी और वो फॉम्युल्याची आहे. ह्यातील विवाहित नायक बाहेरख्यालीपणा करुन यात अडकतो व त्यातून बाहेर पडताना पुन्हा नव्या संकटात सापडतो, अशा आशयाची ही विनोदी कथा असून जोडीला एक छोटेखानी रहस्यही आहे. ह्यतील मुख्य कलाकार प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, शेखर फडके, सिया पाटील, उषा नाईक व इतर आहेत. हा चित्रपट मुंबई, पुणे, कोल्हापुर व महाराष्ट्रातील इतर ठिकाणी ह्या महिन्यात २७ तारीखेला प्रदर्शित होत आहे.
Comments