८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०१० - ठाणे

८४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाणे येथे दि. २५, २६, २७ डिसेंबर २०१० दरम्यान संपन्न होत आहे. या संमेलनाचे भरगच्च कार्यक्रम जाहिर झाले आहेत. संमेलनपूर्व उपक्रम जोरात सुरु आहेत.
दरवर्षी होणार्‍या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत.... आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?
प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान इंटरनेटद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता संमेलनाच्या आयोजकांनी उपलब्ध केली आहे. याचबरोबर आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनातील या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही... साहित्य संमेलनांच्या इतिहासात अशा प्रकारे साहित्य रसिकांना परिसंवादांत सहभागी करुन घेण्याची सोय मराठीसृष्टी या लोकप्रिय वेबपोर्टलच्या सहयोगाने प्रथमच उपलब्ध झाली आहे.
या साहित्य संमेलनात खालील विषयांवर परिसंवाद आयोजित केलेले आहेत. आपण कोणत्याही परिसंवादावर मोकळेपणाने आपली मते मांडू शकता. शब्दसंख्येचे बंधन नाही.
महाविद्यालयातून साहित्यिक - सांस्कृतिक चळवळी हद्दपार झाल्या आहेत का?एका काळी रुईया, रुपारेल सारखी महाविद्यालये विविध प्रकारच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गजबजलेली असायची. असे कार्यक्रम आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासातून वेळ काढून अशा कार्यक्रमात सहभागी होणे कठीण होत आहे हे एक कारण असू शकेल. मात्र अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे या चळवळी महाविद्यालयातून हद्दपार झाल्याचे चित्र दिसत आहे. इंटरनेट आणि सोशल नेटवर्कींगच्या वेबसाईटस यामुळेही एकूणच समाजाच्या सांस्कृतिक-साहित्यिक जाणीवा बोथट झालेल्या दिसतात. आपल्याला काय वाटतं?

अनुवादित साहित्यामुळे मराठीच्या कक्षा रुंदावल्या आहेत का?सध्या मोठ्या प्रमाणात अनुवादित पुस्तकांची निर्मिती होत आहे. भारतीय भाषांमधील पुस्तकांचा अनुवाद हा एक भाग झाला. पण इंग्रजी पुस्तकांच्या अनुवादित आवृत्तीही मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहेत आणि त्यांचा हातोहात खपही होत आहे. या अनुवादित साहित्यामुळे मराठी भाषेचा फायदा होतोय की तोटा?

सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का? राज्यभरात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या गावात सार्वजनिक वाचनालये आहेतच. या वाचनालयांची संख्या किती? त्यात पुस्तके किती? या वाचनालयांकडून साहित्य प्रसारासाठी काही उपक्रम आयोजित होतात का?

मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?आपल्याला आपल्या मातृभाषेची ओळख ही जन्मत:च असते. मनात जे विचार निर्माण होत असतात ते मातृभाषेतच असतात. कोणत्याही व्यक्तीचा विकास होत असतो तो आपल्या मुळ भाषेतच. एक अभ्यास म्हणून इंग्रजी जरुर शिकावी कारण ती जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. मात्र आपल्या मातृभाषेला कोणतीही परकीय भाषा हा पर्याय होउ शकत नाही.

तपासणी - सांस्कृतिक ऐक्याची१० कोटी लोकांची संस्कृती एकच असेल असे मानणे हास्यास्पद आहे का? संस्कृतीची व्याख्या काय असावी? प्रसारमाध्यमांचे सांस्कृतिक ऐक्यासाठीचे योगदान काय?

चला तर मग.... आम्ही आपली वाट पहातोय.......

Comments

Popular posts from this blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण! - डॉ मुरहरी सोपानराव केळे

LESBIAN SHOOT, A CONCEPT BY SHAAN PHOTOGRAPHY WITH MODEL/ACTRESS YASMEEN KHAN AND NATHASSHA SIKKA