इंटरव्यू - सिद्धार्थ जाधव
मराठमोळा कलाकार म्हणून दर्शकांना अभिनेता सिद्धार्थ जाधव फारच आवडतो। जत्रा, माझा नवा तुझी बायको, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जबरदस्त, बकुला नामदेव घोटाळे, साडे माडे तीन, उलाधाल, बाप रे बाप डोक्याला ताप, सालीने केला घोटाळा, गोलमाल रिटर्न, दे धक्का अशा सुपरहिट चित्रपटांत सिद्धार्थ ने अनेक प्रकारच्या भूमिका साकार केल्या आहेत. चित्रपट टारगेट ची प्रेस कान्फ्रेंस नुकचीत मुंबई मध्ये प्रभादेवी स्थित कोहिनूर होटेल मध्ये संपन्न झाली त्यावेळी सिद्धार्थ बरोबर गप्पा मारल्या.
चित्रपट टारगेट मधील भूमिका कशा प्रकारची आहे ?
ह्या मध्ये माझ्या कैरेक्टरचे नाव आहे सत्तार व तो एका खाटकाचा म्हणजेच मटनवाल्याचा मुलगा आहे। ह्यातील माझी भूमिका दमदार आहे
टारगेट ची खासियत काय आहे ?
चित्रपट टारगेट पाच मित्रांचा सिनेमा आहे व त्यांचा आयुष्यात तीन मुली आल्यावर त्यांच्या जीवनाला वेगळेच वळण येते। तशी चित्रपटाची कथा थ्रिलर टाइपची आहे व थोडीशी पोलिटीकल भी आहे.
नाटक जागो मोहन प्यारे बद्दल काही सांगा ?
जागो मोहन प्यारे एकदम जोमात सुरु आहे व ५०० प्रयोगानंतर १००० प्रयोग पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे।
येणारे नवीन चित्रपट कोणते आहे. ?
चित्रपट टारगेट जून मध्ये प्रदर्शित होत आहे व त्यानंतर सुपरस्टार व भैरो पहलवान की जय हे दोन चित्रपट दिवाळी पर्यंत येतील. ह्या दोन्ही चित्रपटातील माझे रोल पावरफुल आहे
Comments