चित्रपट टारगेट प्रदर्शनासाठी सज्ज
जे के मूवीज च्या बैनरखाली निर्मित नवा चित्रपट टारगेट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचे निर्माता जगदिश उनेचा व राकेश उनेचा आहे तर दिग्दर्शक विवेकानंद गोरे व राजेश कोलन आहेत. चित्रपटाची कथानकानुसार ५ मुलं - संजुभाई (स्थानिक भाई), अंकी (बिल्डरचा मुलगा), स्वप्निल (विश्वासरावांचा मुलगा), सत्तार (मुस्लिम मुलगा, मटन शॉपचा मालक), पैडी (पिझ्झा डिलिव्हरी बॉय), एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या या पाच जणांना विशिष्ट ध्येय किंवा महत्वाकांक्षा नाही. एके दिवशी योगायोगाने त्यांना तीन सुंदर मुली भेटतात. सोनल, कोमल व निशा. पण या भेटीचं रुपांतर भांडणांत होतं व त्यानंतर चित्रपटाची खरी एक्शन सुरु होते व आता ही एक्शन कशा प्रकारची आहे तर लवकरच आपल्याला चित्रपट टार्गेट मध्ये पहावयास मिळणार आहे.
चित्रपटातील मुख्य कलाकार संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी, भूषण क्रांती रेडकर, तेजस्वीनी पंडित, स्मिता गोंदकर, विनय आपटे, संजय मोने, अन्वय बेंद्रे, भारत गणेशपुरे, अथर्व कर्वे आणि मानसी नाईक. तसेच ह्यामध्ये एकूण पाच गाणी आहेत व ह्या गाण्यांना वैशाली सामंत, आनंद शिंदे, रोमा कुलकर्णी, अवधूत गांधी ने आवाजाचा ताल दिला आहे. हा चित्रपट जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
Comments