अशोक शिंदे व गश्मीर महाजनी यांचे "मोरया" गणपतीच गाणं
शंकर मराठे, मुंबई - ३० आगस्ट, २०२२ : "मोरया" गणपतीच गाण.
गाण्याची लिंक - https://www.youtube.com/watch? v=mrFhrSTyLpQ.
गाण्याला उत्कृष्ट आवाजात स्वर दिले आहेत "सौरभ साळुंके" यांनी, लिहिले आणि संगीत दिग्दर्शक केले आहे "निलेश पाटील" यांनी, आणि दिग्दर्शक केले आहे "कविता गांधी" यांनी.
टिप्स म्युझिक आपल्या प्रेक्षकांसाठी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एक धमाकेदार गाण घेऊन येत आहेत ज्याच नाव आहे "मोरया". या गाण्याचे संगीत इतके जोमदार आणि धडाकेदार आहे कि ऐकल्या ऐकल्या पाय आपणच नाचायला लागतात. बाप्पा जेव्हा आपल्या कडे येतो तेव्हा एक वेगळोच आनंद आणि उत्साह असतो त्याच आगमन कस मोठ्या थाटा माटाने आणि ढोल - नगाड्यांच्या जोरदार तालात नाचत नाचत करतो हे या गाण्यात दाखवले आहे.
गणेश चतुर्थीच्या ह्या उत्सवाला हे गाणं आगमनात प्रत्येक ठिकाणी सर्वांच्या प्ले लिस्ट माधे नक्कीच टॉप वर असणार. गाण्याचे बोल इतके गोड़ आहेत कि पाहणाऱ्या सर्व दर्शकांच्या हृदयाला हे स्पर्श करेल आणि त्यांना आपल्या लाडक्या बाप्पा प्रति भावुक करेल .
"मोरया" ह्या गाण्यात आपल्याला बाप्पा च्या प्रति असलेली भावना आणि आगमनाची आतुरता खुप छान पणे दर्शवली आहे. गाण्यामधे आपल्याला अभिनय करताना दिसतील अशोक शिंदे आणि गश्मीर महाजनी जी. त्यांनी गाण्यामधे अभिनय करताना दाखवल आहे कि आपण बाप्पाकडे कशी प्रार्थना करतो तो आपल्याला कस सांभाळून घेतो हे दर्शवले आहे.
गाण्याबद्दल प्रतिक्रिया देताना अशोक शिंदे म्हणता," बाप्पाची आतुरता हि नेहमीच सर्वांच्या मनात असते आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या गाण्यात मला सहभागी होता आल ह्याला मी माझा भाग्य मानतो.मला ह्या गाण्यात अभिनय करायची संधी मिळाली त्यासाठी मी टिप्स, कुमारजी तौरानी आणि गिरीश तौरानी यांचा आभारी आहे. निलेश पाटील ह्यांनी खुप सुंदर असे हे गीत लिहिले आहे. मराठी मध्ये सौरभ साळुंखे आणि हिंदी मध्ये नवराज हंस यांच्या आवाजाने गाण्याला बहार आली आहे. कविता गांधी यांनी खुप सुंदर नृत्यदिग्दर्शन केले आहे. गाण्याचे बोल आणि संगीत खुप छान आहेत जे आपल्या गणेश भक्तांना नक्कीच आवडेल. "मोरया" गाण्याला ऐका आणि तुमच खुप प्रेम दया. गणपती बाप्पा मोरया".
Comments